Crime News: २० दिवसांच्या मजुरीचे पैसे द्यायला केला उशीर; चाकूने भोस्कुन केली मालकाची हत्या

Crime News: २० दिवसांच्या मजुरीचे पैसे द्यायला केला उशीर; चाकूने भोस्कुन केली मालकाची हत्या

Published on

Bhiwandi Crime: वीस दिवसांच्या मजुरीचे पैसे देण्यास उशीर केल्याच्या रागातून मालकाची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना पूर्णा येथील एका कंपनीत घडली आहे.

याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून मारेकऱ्याला अटक करण्यात आली आहे.

Crime News: २० दिवसांच्या मजुरीचे पैसे द्यायला केला उशीर; चाकूने भोस्कुन केली मालकाची हत्या
Nashik Extortion Crime News : अवैध सावकाराकडून खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी! सावकारी करणाऱ्या वैभव देवरेला अटक

पूर्णा येथील अरिहंत कम्पाऊंडमधील महाराष्ट्र पी.व्ही.सी. कंपनीत काम करणाऱ्या अमित प्रजापती (२३, रा. कोपर) याने काही कारणास्तव काम सोडले होते. त्यापूर्वी त्याने कंपनीत २० दिवस मजुरीचे काम केले होते. त्यामुळे कंपनीचा मालक राकेश सिंगकडे (४५, रा. पालघर) मजुरीच्या पैशांची मागणी केली. या वेळी राकेश आणि अमित यांच्यात पैसे देण्यावरून शाब्दिक बाचाबाची झाली.

Crime News: २० दिवसांच्या मजुरीचे पैसे द्यायला केला उशीर; चाकूने भोस्कुन केली मालकाची हत्या
Crime News: पोटच्या पोरीसोबत केले अश्लील चाळे, विनयभंगप्रकरणात पित्याला कारावास

हा वाद अधिकच वाढल्याने अमितने शिवीगाळ करत राकेशला चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. हल्ल्यानंतर कासारवडवली येथील प्राईम रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुरुवारी (ता. ११) अमितला पोलिसांनी ताब्यात घेतले. भिवंडी न्यायालयाने १६ एप्रिलपर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.

Crime News: २० दिवसांच्या मजुरीचे पैसे द्यायला केला उशीर; चाकूने भोस्कुन केली मालकाची हत्या
Navi Mumbai Crime: खांदेश्वर, पनवेल व परिसरातुन बुलेट व इतर मोटारसायकल चोरी करणारी राजस्थानी टोळी गजाआड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.