Thane Loksabha: शिंदेंचा गेम हाणारच? निवडणूक लढवण्यास 'हा' नेता उत्सूक; म्हणाले पक्षाने संधी दिली तर..
Eknath shinde loksaha bjp shivsena

Thane Loksabha: शिंदेंचा गेम हाणारच? निवडणूक लढवण्यास 'हा' नेता उत्सूक; म्हणाले पक्षाने संधी दिली तर..

Published on

ठाणे, ता. १२ : लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून महायुतीत खलबते सुरू आहेत. ही जागा कोणाकडे जाणार हे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. त्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून वारंवार दावे-प्रतिदावे होत असताना पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढण्यास तयार असल्याचे भाजपचे आमदार संजय केळकर यांनी सांगितल्याने नव्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

Thane Loksabha: शिंदेंचा गेम हाणारच? निवडणूक लढवण्यास 'हा' नेता उत्सूक; म्हणाले पक्षाने संधी दिली तर..
Eknath Shinde : शिवतारे उद्याच्या पुरंदरचे किल्लेदार असतील ,शिंदे ; ‘महायुती’तर्फे सासवडमध्ये जनसंवाद सभा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. एकीकडे शिवसेना शिंदे गट, तर दुसरीकडे भाजपकडूनही या जागेवर दावा करण्यात येत आहे. भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडूनही मतदारसंघातील उमेदवारीवरून भाष्य केले जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील नवीन पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात ठाणे हे भाजपसाठी महत्त्वाचे असल्याचे सूचक विधान केले होता.

Thane Loksabha: शिंदेंचा गेम हाणारच? निवडणूक लढवण्यास 'हा' नेता उत्सूक; म्हणाले पक्षाने संधी दिली तर..
CM Eknath Shinde : मोदींची वक्रदृष्टी पडल्यास फेस येईल; उद्धव ठाकरेंवर निशाणा

त्यापाठोपाठ भाजपचे आमदार संजय केळकर यांनीदेखील पक्षाने तिकीट दिल्यास निवडणूक लढण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. तसेच ठाणे लोकसभा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ असून या मतदारसंघात रामभाऊ कापसे हे भाजपचे खासदार होते.

पण ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांनी नगरसेवक अधिक असल्याचे गणित मांडत शिवसेनेकडे हा मतदारसंघ मागितला होता, पण आता परिस्थिती बदलली असून ठाण्यात भाजपचे आमदार आणि नगरसेवकांची संख्या अधिक असल्याने ही जागा भाजपला मिळावी, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.

Thane Loksabha: शिंदेंचा गेम हाणारच? निवडणूक लढवण्यास 'हा' नेता उत्सूक; म्हणाले पक्षाने संधी दिली तर..
CM Eknath Shinde: गडकरी विजयाचे सगळे विक्रम मोडतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.