Mumbai Crime News: क्यूआर कोडमुळे मुलाची पालकांशी पुन्हा झाली भेट; वाचा नक्की काय घडलं
Mumbai Crime News:sakal

Mumbai Crime: घरकाम करणाऱ्या मुलिने केले ४ वर्षीय मुलाचे अपहरण अन्.. वाचा नक्की काय घडले

Published on


Dombivali Crime: घरात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीने घरातील चार वर्षीय चिमुरड्याचे अपहरण केल्याची तक्रार शनिवारी मानपाडा पोलिस ठाण्यात करण्यात आली. मात्र अपहरणकर्त्या १७ वर्षीय मुलीला काही तासांतच पोलिसांनी ताब्यात घेतले असता आरोपीच पीडित असल्याची माहिती समोर आली.

पीडितेला बांगलादेशातून फूस लावून भारतात आणत तिला वेश्या व्यवसायात ढकलण्यात आले होते. घरातील मालक तिच्यावर अत्याचार करत होता, यातून बाहेर पडण्यासाठी तिने हे कृत्य केल्याची माहिती मानपाडा पोलिसांनी दिली.

Mumbai Crime News: क्यूआर कोडमुळे मुलाची पालकांशी पुन्हा झाली भेट; वाचा नक्की काय घडलं
Dombivali Crime : वेश्या व्यवसायातून सुटका व्हावी म्हणून अल्पवयीन मुलीने उचलले टोकाचे पाऊल

गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राम चोपडे यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, मानपाडा पोलिस ठाण्यात शनिवारी (ता.१३) अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. यामध्ये घरकाम करणारी एक अल्पवयीन मुलगी घरातील बाळाला घेऊन पसार झाल्याची तक्रार करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही तत्काळ आरोपी मुलीचा शोध सुरू केला.

यामध्ये अवघ्या काही तासांत भिवंडी येथून आरोपी मुलीला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर तिच्याकडे चौकशी केली असता आरोपी स्वतः पीडित असून तिला बांगलादेशामधून वेश्या व्यवसायासाठी तिची आई, मावशी यांच्यासह भारतात आणले गेल्याची माहिती समोर आली.

Mumbai Crime News: क्यूआर कोडमुळे मुलाची पालकांशी पुन्हा झाली भेट; वाचा नक्की काय घडलं
Dombivali News : कल्याण मध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भेटीला आले हेमंत गोडसे

तिला ज्या घरात कामास ठेवण्यात आले होते त्या घरातील सतीश रजक आणि त्याचा चुलत भाऊ सचिन रजक यांनी या अल्पवयीन मुलीला वेगवेगळ्या ठिकाणी वेश्या व्यवसायासाठी पाठवले होते. तसेच तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. तिच्या तक्रारीवरून त्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच पीडित मुलीला सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे.


अपहृत बाळ सुखरूप आईच्या ताब्यात


पीडित मुलीला बाहेर जाण्याचे सर्व मार्ग बंद केल्यामुळे त्या अल्पवयीन मुलीकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. तेथून बाहेर पडण्यासाठी व त्या व्यवसायातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी हे बाळाचे अपहरण केल्याची कबुली पीडितेने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील उर्वरित आरोपींचा शोध घेण्यात येत असून अपहृत बाळाला आईच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले आहे.

Mumbai Crime News: क्यूआर कोडमुळे मुलाची पालकांशी पुन्हा झाली भेट; वाचा नक्की काय घडलं
Dombivali News : डोंबिवली मनसे शहर संघटक मिहीर दवते यांचा पक्षाला रामराम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.