Tata Memorial Hospital
Tata Memorial Hospitalesakal

Tata Cancer Memorial: टाटा हॉस्पिटलच्या कर्करोग सेंटरचे वसई येथे उद्‍घाटन! कर्करोगावर मात करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

Published on

वसई, ता. १६ (बातमीदार) : टाटा हॉस्पिटल आणि अन्य प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रशिक्षित तज्ज्ञ हे सनराईज ऑन्कोलॉजी सेंटरमध्ये सेवा देण्याचे उद्दिष्ट असलेल्या उच्च दर्जाच्या देखभालीचे प्रमाण आहे. मूल्य-आधारित आणि रुग्ण-केंद्रित दृष्टिकोनांवर भर देत कर्करोगावर मात करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे प्रतिपादन टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी काढले.

कर्करोग सेंटरचे उद्‍घाटनप्रसंगी आर्चबिशप फेलिक्स मच्याडो, युरी गोन्साल्विस, टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता, सनराईज ऑन्कोलॉजी सेंटरचे संचालक डॉ. आशय कर्पे, डॉ. राजीव शर्मा, रिचर्ड वाझ यांच्यासह संचालक मंडळ, तसेच इस्पितळाचे डॉक्टर व सहकारी उपस्थित होते. पालघर जिल्ह्यातील कर्करोगग्रस्त रुग्णांची काळजी घेण्यासाठी वसई कार्डिनल ग्रेशियस इस्पितळ येथे सनराईज ऑन्कोलॉजी सेंटर सुरू करण्यात आले आहे. केमोथेरपी आणि इम्युनोथेरपी यासारख्या उपचारांसह आवश्यक सेवांसह, कर्करोग उपचार प्रदान करणे हे नवीन केंद्राचे उद्दिष्ट आहे. रुग्ण व्यवस्थापन सॉफ्टवेअरची व्यवस्थादेखील आहे, अशी माहिती देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.