रायगड जिल्हा कृषी सेवा असोसिएशन ची खरीप हंगामासाठी पेण मध्ये बैठक

रायगड जिल्हा कृषी सेवा असोसिएशन ची खरीप हंगामासाठी पेण मध्ये बैठक

Published on

पेणमध्ये रायगड जिल्हा कृषी सेवा असोसिएशनची खरीप हंगामानिमित्त बैठक
पेण (वार्ताहर) : रायगड जिल्हा कृषी असोसिएशनच्‍या वतीने १५ एप्रिल रोजी येथील आगरी समाज हॉलमध्ये खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील सर्व कृषी व्‍यावसायीक व कृषी निविष्ठा आणि भात बियाणे कंपनी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्यात अनेक शेतकरी भात पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. मात्र अनेक ठिकाणी भात बियाणाचे दर वेगवेगळे असल्याने शेतकरी संभ्रमात पडतात. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी इतर ठिकाणी जाऊन बियाणे खरेदी करतात. त्‍यामुळे कृषी असोसिएशने याप्रकरणी दखल घेऊन संपूर्ण जिल्ह्यात भात बियाणाचे एक दर एक जिल्हा ही नवीन संकल्पना आखली आहे. त्यामुळे प्रत्येक भागातील शेतकऱ्यांना कोणत्याही तालुक्यात किंवा इतर ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही, प्रत्येक कृषी सेवा केंद्रावर प्रत्येकी भात बियाण्याचे दर एकच असणार आहेत, असे यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांची होणारी लूट थांबणार असून होणार त्रास कमी होणार आहे. यावेळी जिल्हा असोसिएशन अध्यक्ष दिनेश म्हात्रे, उपाध्यक्ष पराग वैरागी, जयवंत वाघ, अमोल पाटील, रमेश पाटील, परेश मोकळ, सलागार मितेश जाधव सूत्रसंचालक विष्णू ऐनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
...............
महात्मा गांधी वाचनालयात आंबेडकर जयंती साजरी
पेण (बातमीदार) ः येथील महात्मा गांधी ग्रंथालयात महात्मा स्मारक संस्था तर्फ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भारतीय राज्यघटना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तसेच बाबासाहेबांच्‍या जीवनावर प्रश्‍नमंजुषा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्‍या हस्‍ते भेटवस्तू देण्यात आल्या. या कार्यक्रमास महात्मा गांधी वाचनालयाचे अध्यक्ष अरविंद वनगे, कार्याध्यक्ष आप्पा सातवे, सदस्य नंदा म्हात्रे, सदस्य तानाजी घोडगे, पारिजात वनगे, वाचक वर्ग, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

..........................
पेणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
पेण (वार्ताहर) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात पेणमध्ये साजरी करण्यात आली. यावेळी शहरात असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सकाळपासूनच अनेकांकडून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर संध्याकाळच्या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची रथाद्वारे भव्य स्वरूपात निघालेल्या मिरवणुकीत तालुक्यातील भीम अनुयायांबरोबर असंख्य नागरिकांनी सहभाग नोंदविला. यावेळी संपूर्ण शहरातून निघालेल्या मिरवणुकीतून शहर निळेमय झाले होते. यादरम्यान डीजेच्या तालावर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणुकीच रंगत वाढली. यावेळी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आमदार अनिकेत तटकरे, उद्योजक राजू पिचीका, माजी नगरसेवक पांडुरंग जाधव, शहर अध्यक्ष आनंद जाधव, नरेंद्र जाधव, नागेश सुर्वे, प्रभाकर घायतले, काँग्रेस सरचिटणीस चंद्रकांत पाटील, समाजसेविका सुवर्णा सोनावणे यासह हजारो भीमसैनिक, पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनीही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना यावेळी अभिवादन केले..
.......................
प्रामाणिक रिक्षा चालकाचे पनवेल शहर पोलिसांनी केले कौतुक
पनवेल ता.15( बातमीदार): रिक्षात सापडलेला मोबाईल फोन प्रामाणिकपणे पनवेल शहर पोलीस स्टेशनला आणून दिल्याने पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी रिक्षा चालकाचे कौतुक केले आहे.
संदीप काळुराम पाटील रा. पारगाव असे या रिक्षा चालकाचे नाव असून त्याची रिक्षा क्रमांक एम.एच. ४६ ए.झेड. ७५८४ या रिक्षात पनवेल एस.टी.स्टॅन्ड समोरील रिक्षा थांब्यावर महिला पोलीस कॉन्स्टेबल वर्षा गणेश पाटील या सकाळी बसल्या व पनवेल शहर पोलीस ठाण्यात आल्या या प्रवासादरम्यान त्यांचा मोबाईल रिक्षाच्या मागील सीट वरील कोपऱ्यात पडला परंतु हि बाब वर्षा पाटील यांच्या लक्षात न आल्याने त्या घाई घाईने पोलीस ठाण्यात कर्तव्य बजाविण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्या काही वेळा नंतर रिक्षाचालक संदीप पाटील यांना त्यांच्या रिक्षामध्ये मोबाईल फोन पडल्याचे समजले त्यांनी तातडीने पनवेल शहर पोलीस ठाण्यात येऊन सदर फोन जमा केला. व तो फोन वर्षा पाटील यांचा असल्याचे निष्पन्न झाले. रिक्षा चालक संदीप पाटील यांच्या प्रामाणिकपणाचे पोलिसांनी कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.