Navi Mumbai : एनएमएमटीचा फुकट्या प्रवाशांना दणका; कमावले १८ लाख
Navi Mumbai Bus: नवी मुंबई शहरामधून दररोज हजारो प्रवासी कामानिमित्त बाहेर पडत असतात. या प्रवाशांसाठी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने परिवहनच्या उपक्रमातून एनएमएमटीची उत्तम सुविधा प्रवाशांच्या पसंतीस उतरत आहे.
त्यात सध्या इलेक्ट्रिक एसी बसला जास्त पसंती मिळत आहे. त्यातच एनएमएमटीच्या बसने विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांना दणका दिला आहे. नवी मुंबई परिवहन सेवेकडून गत पाच वर्षांत १७ हजार ५०४ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत २७ लाख ५७ हजार ३९७ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. (NMMT buses have given a bang to the free passengers traveling without tickets)
नवी मुंबई महापालिकेच्या बसमधून प्रवास करणाऱ्यांवर कारवाई सुरूच असून एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालवधीत तीन हजार ४२३ फुकट्या प्रवाशांवर एनएमएमटीकडून कारवाई करण्यात आलेली आहे. एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत तीन हजार ९९३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. २०२२-२३ च्या तुलनेत २०२३-२४ मध्ये ५७०नी फुकट्या प्रवाशांची संख्या घटली आहे.
प्रशासनाकडून नियमित करवाई होत असल्यामुळे फुकट्या प्रवाशांची संख्या घटली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल आणि उरण भागात एनएमएमटीच्या बसला सकाळ व सायंकाळच्या वेळेत प्रचंड गर्दी असते. काही प्रवासी भाडे चुकवण्यासाठी गर्दीच्या परिस्थितीचा फायदा घेतात. एनएमएमटीने समस्या सोडवण्यासाठी ५० तिकीट तपासनीस तैनात केले आहे. यांच्याकडून फुकट्या प्रवाशांवर कारवाई होत असल्यामुळे ही संख्या घटली आहे. (Thane, Kalyan, Dombivli, Panvel and Uran)
दंडाची रक्कम वाढली
विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या दंडातदेखील एनएमएमटीने वाढ केलेली आहे. पूर्वी सामान्य बससाठी १०० रुपये आणि वातानुकूलित बससाठी २०० रुपये दंड आकारला जात होता. आता सामान्य बससाठी दंडाची रक्कम १५७ रुपये आणि वातानुकूलित बससाठी ३१० रुपये करण्यात आली आहे. दंडाची रक्कम वाढल्यामुळे फुकट्या प्रवशांची संख्या घटली आहे.
आर्थिक वर्षात नवी मुंबई परिवहन उपक्रमाला विनातिकीट प्रवासी दंडातून १० लाख रुपये इतके उत्पन्न मिळेल, असा अंदाज अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आला होता; मात्र या उत्पन्नात घट झाली आहे. तिकीट तपासनीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्या सततच्या कारवाईमुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांमध्ये घट झाली. त्यामुळे उपक्रमाच्या तिकीटविक्रीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. ही बाब परिवहनसाठी लाभदायक ठरली आहे.
- योगेश कडुसकर, व्यवस्थापक, एनएमएमटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.