Accident News: मुंबईत विविध ठिकाणी झालेल्या दोन अपघातात दोघांचा मृत्यू
Accident Newssakal

Accident News: मुंबईत विविध ठिकाणी झालेल्या दोन अपघातात दोघांचा मृत्यू

Published on

Andheri News: कांदिवली आणि बोरिवलीतील दोन अपघातांत दोघांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी समतानगर आणि एमएचबी पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघातांची नोंद करून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Accident News: मुंबईत विविध ठिकाणी झालेल्या दोन अपघातात दोघांचा मृत्यू
Accidnet News: मासेमारी करणाऱ्या बोटीला मालवाहू जहाजाची धडक

पहिला अपघात बोरिवलीतील न्यू लिंक रोड, गणपत पाटील नगर, गल्ली क्रमांक नऊजवळ झाला. याच परिसरात संतोष बसवराज सलगर हा ४३ वर्षांचा व्यक्ती राहत होता. त्याची पत्नी आणि दोन्ही मुले मालाड येथे राहत असून गेल्या दोन वर्षांपासून तो त्याच्या पत्नीपासून वेगळा राहत होता. त्याला दारूचे व्यसन होते.

सोमवारी रात्री साडेअकरा वाजता संतोषला एका अज्ञात वाहनाने धडक दिली होती. त्यात तो गंभीर जखमी झाला. शताब्दी रुग्णालयात डॉक्टरांनी त्‍याला मृत घोषित केले. पत्नी प्रिती सलगर हिच्या तक्रारीनंतर एमएचबी पोलिसांनी पळून गेलेल्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Accident News: मुंबईत विविध ठिकाणी झालेल्या दोन अपघातात दोघांचा मृत्यू
Pune Accident: खेड शिवापूर टोलनाक्याजवळ टँकर उलटला; परिसरात मोठी वाहतूक कोंडी

दुसऱ्या अपघातात साईल जिलानी शेख या २० वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. साईल हा कांदिवली येथे राहत असून २९ मार्चला तो दुचाकीवरून लोखंडवाला सर्कल, गोदरेज हाईटसमोरून जात होता.

भरधाव वेगात असल्‍याने त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दुचाकी घसरल्‍याने तो गंभीररीत्या जखमी झाला होता. कूपर रुग्णालयात उपचारादरम्‍यान त्याचा मृत्यू झाला.

Accident News: मुंबईत विविध ठिकाणी झालेल्या दोन अपघातात दोघांचा मृत्यू
Sri Lanka Car Racing Accident: श्रीलंकेत कार रेसिंगमध्ये भीषण दुर्घटना; लहान मुलासह ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू तर २३ जण जखमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.