Vasai News: २५ दिवसानंतर अखेर 'त्या' बिबट्याला जेरबंद करण्यात आले यश; वसईकरांनी सोडला सुटकेचा निश्वास
Vasai Newssakal

Vasai News: २५ दिवसानंतर अखेर 'त्या' बिबट्याला जेरबंद करण्यात आले यश; वसईकरांनी सोडला सुटकेचा निश्वास

परिसरात बिबट्याच्या वावर असल्याने अनेक दिवसांपासून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते; मात्र बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी आता सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
Published on

Bolinj News: वसई किल्ल्यात मागील २५ दिवसांपासून तळ ठोकून बसलेल्या बिबट्याला मंगळवारी (ता. २३) पहाटे जेरबंद करण्यात आले. वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या जेरबंद झाला आहे.

परिसरात बिबट्याच्या वावर असल्याने अनेक दिवसांपासून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते; मात्र बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी आता सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

Vasai News: २५ दिवसानंतर अखेर 'त्या' बिबट्याला जेरबंद करण्यात आले यश; वसईकरांनी सोडला सुटकेचा निश्वास
Mumbai News: तीन वर्षापासून न्यायालयात आलेच नाहीत, दोघांना पोलिसांनी केले कैद!

वसई किल्ल्यात २९ मार्चला बिबट्या आढळून आला होता. या ठिकाणाहून जाणाऱ्या एक मोटरसायकलस्वाराला त्याची धडक बसली होती. तेव्हापासून हा बिबट्याने वसई किल्ल्याच्या परिसरातच तळ ठोकून होता. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. तसेच वनविभागाने किल्ल्यातील भागात ट्रॅप कॅमेरे, रेस्क्यू पथक, आवश्यक ठिकाणी पिंजरे लावले होते.

परंतु मानवी वर्दळ व इतर अडचणींमुळे २० ते २५ दिवस उलटून गेले, तरी या बिबट्याचा शोध लागला नव्हता. त्यानंतर वनविभागाने सातत्याने बिबट्याला पकडण्याच्या नियोजनामध्ये बदल केला. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यानुसार पिंजरे लावले जात होते. वसई किल्लादेखील बंद केला होता. येथील वसई-भाईंदर रो-रो सेवेवरदेखील त्याचा प्रभाव पडला होता.

Vasai News: २५ दिवसानंतर अखेर 'त्या' बिबट्याला जेरबंद करण्यात आले यश; वसईकरांनी सोडला सुटकेचा निश्वास
Mumbai: इगतपुरी यार्डमध्ये रेल्वेची मॉकड्रील; कोचमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरूप सुटका!

तुंगारेश्वर अभयारण्यातून स्थलांतर

अखेरीस मंगळवारी पहाटे साधारण साडेतीनच्या सुमारास किल्ल्यातील एका पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. हा बिबट्या जवळच असलेल्या तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यामधून या ठिकाणी स्थलांतर करून आला होता.

तुंगारेश्वरमधील बिबट्या संशोधनादरम्यान त्याचे छायाचित्र टिपण्यात आले होते. त्यामुळे त्याचा सुगावा लागला होता. किल्ल्यात वास्तव्यास असताना तो भटक्या कुत्र्यांची शिकार करत होता. आता हा बिबट्या जेरबंद झाल्याने त्याला पुन्हा तुंगारेश्वर येथील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येण्याची शक्यता आहे.

Vasai News: २५ दिवसानंतर अखेर 'त्या' बिबट्याला जेरबंद करण्यात आले यश; वसईकरांनी सोडला सुटकेचा निश्वास
Navi Mumbai Crime: पोलिसांनी केली मोठी कारवाई; तब्बल १० लाखांचा एमडी जप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.