Palghar News: अल्पसंख्याकांची नाराजी कोणाला भोवणार? ठाकरेंकडे कल मात्र...
Palghar Loksabha: पालघर लोकसभा मतदारसंघातील सुमारे १२ टक्के असलेली अल्पसंख्याकांची मते या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. भाजपवगळता शिवसेना ठाकरे गट आणि बविआकडून अल्पसंख्याकांची मते मिळवण्यासाठी जोर लावला जाईल.(Palghar)
सध्या अल्पसंख्याक मतदारांमध्ये उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता वाढत असल्याने त्यांची मते आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून सुरू आहे. तर मुस्लिम मतदार आपल्यासोबत राहील, असा विश्वास बविआला आहे. त्यामुळे महायुती, महाविकास आघाडी आणि बविआच्या तिरंगी लढतीत एकगठ्ठा होणारे अल्पसंख्याक मतदार विजयात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.(mahayuti news)
सध्या वसई तालुक्यासह संपूर्ण पालघर लोकसभा मतदारसंघात मुस्लिमांची सुमारे दीड लाख मतदार आहेत. तर वसईच्या पश्चिम पट्ट्यासह इतर भागांत एक लाख ख्रिस्ती बांधव आहेत. असे एकूण अडीच लाखांच्या घरात अल्पसंख्याक आहे.
एकगठ्ठा होणारे मतदान मिळवण्यासाठी भाजपवगळता उद्धव ठाकरे गट, बविआ आणि नव्याने जिजाऊचे लक्ष लागले आहे. मध्यंतरी मुस्लिम कब्रस्तान, दफनभूमीच्या मुद्द्यावर वसई तालुक्यात आंदोलन झाले होते. पालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून बविआला दफनभूमीच्या मुद्द्यावर घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.(loksabha 2024)
त्यानंतर पालिकेने दफनभूमी, कब्रस्तान विकासाचे काम सुरू केले. तर दुसरीकडे वसईच्या पश्चिमपट्ट्यात ख्रिस्ती मते निर्णायक आहेत. ख्रिस्ती मते मिळावी, यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत. मुस्लिम-ख्रिस्ती धर्मीयांची मते मिळवण्यासाठी बविआ आणि उद्धव ठाकरे गट कोणती रणनीती आखणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
पालघर लोकसभा मतदारसंघातील अल्पसंख्याकांच्या मतावर राज्य करणाऱ्या बविआला महायुतीचा घटक पक्ष म्हणून उल्लेख केला जात आहे. बविआने भाजपविरोधाची भूमिका घेण्यास सुरुवात केल्यापासून उद्धव ठाकरे यांच्याकडे अल्पसंख्याक मतदार आकर्षित होऊ लागला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत अल्पसंख्याक मते ठाकरे गटाच्या उमेदवाराकडे वळू शकतात, असा अंदाज बांधला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.