Crime News: वीजपुरवठा खंडीत करण्याची भीती दाखवून ऑनलाइन गंडा; ८६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला फसवले
Crime Newssakal

Crime News: वीजपुरवठा खंडीत करण्याची भीती दाखवून ऑनलाइन गंडा; ८६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला फसवले

Published on

Navi Mumbai News: विद्युत बिल न भरल्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची भीती दाखवून एका सायबर टोळीने वाशी सेक्टर-२९ येथील ८६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला अडीच लाखांचा गंडा घातला आहे. वाशी पोलिसांनी या प्रकरणातील सायबर चोरट्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.


या घटनेत फसवणूक झालेले ८६ वर्षीय ज्येष्ठ नागरिक जयकिशन शुक्ला हे वाशी सेक्टर-२९ मध्ये राहण्यास आहेत. गत महिन्यामध्ये शुक्ला आपल्या घरामध्ये असताना, त्यांच्या मोबाईलवर सायबर चोरट्यांनी मेसेज पाठवून त्यांचे विद्युत बिल न भरल्याने लाईट दोन दिवसांत कापली जाईल, अशी भीती दाखविली.

Crime News: वीजपुरवठा खंडीत करण्याची भीती दाखवून ऑनलाइन गंडा; ८६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला फसवले
Crime News : येडेश्वरी देवीच्या यात्रेत चोरट्यांनी लाखोंचे दागिने पळवले

तसेच सदर मेसेजच्याखाली संपर्क साधण्यासाठी मोबाईल नंबर दिला. त्यामुळे शुक्ला यांनी घाबरून सदर मोबाईल नंबरवर संपर्क साधला असता, समोरील सायबर चोरट्याने एमएसईबीच्या कार्यालयातून बोलत असल्याचे भासवून त्यांच्या वीज मीटरबाबत, तसेच मागील वेळेस भरलेल्या बिलाची माहिती दिली.

त्यामुळे शुक्ला यांचा त्याच्यावर विश्‍वास बसला. त्यानंतर समोरील सायबर चोरट्याने शुक्ला यांचे भरण्यात आलेले विद्युत बिल रेकॉर्डवर दाखवत नसल्याचे सांगून शुक्ला यांच्याकडून त्यांच्या डेबिट कार्डची संपूर्ण माहिती मागून घेतली. त्यानंतर सायबर चोरट्याने शुक्ला यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या खात्यातून दोन लाख ५७ हजार रुपये काढून घेतले. याबाबतचे मेसेज त्यांच्या मोबाईलवर आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे शुक्ला यांच्या लक्षात आले.

Crime News: वीजपुरवठा खंडीत करण्याची भीती दाखवून ऑनलाइन गंडा; ८६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला फसवले
Crime News: अंमली पदार्थाच्या तस्कारांविरोधात धडक कारवाई; ११ आफ्रिकन नागरिकांना घेतले ताब्यात

त्यानंतर त्यांनी वाशी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात सायबर चोरट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

Crime News: वीजपुरवठा खंडीत करण्याची भीती दाखवून ऑनलाइन गंडा; ८६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला फसवले
Pune Cyber Crime : सायबर चोरट्यांचा धुमाकूळ कायम ; वेगवेगळ्या गुन्ह्यांत तीन जणांची ६५ लाखांची फसवणूक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.