Crime News: अंमली पदार्थाच्या तस्कारांविरोधात धडक कारवाई; ११ आफ्रिकन नागरिकांना घेतले ताब्यात
Navi Mumbai Crime: नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने शुक्रवारी (ता. २६) दुपारी कोपरी गाव सेक्टर २६ ए मधील एका इमारतीत छापा मारत अमली पदार्थाची विक्री करण्याच्या उद्देशाने जमलेल्या ११ आफ्रिकन नागरिकांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल एक कोटी ८३ लाख रुपये किमतीचे कोकेन, मेथ्यॉक्युलॉन व एमडीएच्या गोळ्या असा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत गुन्हे शाखेने तब्बल १,६७९ ग्रॅम वजनाचे कोकेनही जप्त केले असून या कोकोनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत १६ कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे समजते. या कारवाईत गुन्हे शाखेने ८१ हजारांची रोख रक्कम व १७ मोबाईल फोन जप्त केले आहेत.
वाशीतील कोपरीगाव सेक्टर २६ ए येथील कुष अपार्टमेंटमधील दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर सात खोल्यांमध्ये राहणारे आफ्रिकन नागरिक वेगवेगळ्या प्रकारच्या अमली पदार्थाची देवाण-घेवाण करून त्याची विक्री करण्यासाठी उद्देशाने एकत्र येत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती.
त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, आर्थिक गुन्हे शाखा, वाशी व एपीएमसी पोलिस ठाण्यातील १० सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक, तसेच ४५ अंमलदारांचा फौजफाट्यासह ही कारवाई करण्यात आली. शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास या पथकाने संबंधित इमारतीवर एकाचवेळी छापा मारत ११ आफ्रिकन नागरिकांची धरपकड केली.
त्यांच्याजवळ एक कोटी ६९ लाख रुपये किमतीचे १,६७९ ग्रॅम वजनाचे कोकेन, नऊ लाख ७० हजार रुपये किमतीचे ९७ ग्रॅम मेथ्यॉक्युलॉन व सहा लाख ४४ हजार रुपये किमतीचे ४६ ग्रॅम वजनाच्या एमडीएच्या गोळ्या असा एकूण एक कोटी ८३ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ सापडले.
त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्याजवळ सापडलेले सर्व अमली पदार्थ जप्त करून ११ आफ्रिकन नागरिकांविरोधात एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून सर्वांना अटक केली आहे.
गुन्हे शाखेने या कारवाईत तब्बल १,६७९ ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त केले आहे. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत १६ कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे बोलले जात आहे. या आफ्रिकन नागरिकांनी सदरचे अमली पदार्थ कुठून आणले, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.