Mumbai News: पाकिस्तानात अडकलेल्या ‘त्या’ खलाशावर अखेर मुंबईमध्ये झाले अंत्यसंस्कार
Bordi News: पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू झालेल्या विनोद लक्ष्मण कोल (वय ४४) या खलाशी कामगाराच्या पार्थिवावर डहाणू तालुक्यातील अस्वली गावाच्या गोरात पाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
कोल ऑगस्ट २०२२ मध्ये गुजरात येथील मासेमारी बंदरात खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी खलाशी कामगार म्हणून नोकरीवर गेले होते. २७ सप्टेंबर रोजी त्यांनी पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केल्याच्या कारणावरून पाकिस्तानी पोलिसांनी त्यांना अटक केली होती.
तुरुंगात ८ मार्च रोजी त्यांना पक्षाघाताचा झटका आल्यानंतर त्यांना तेथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; परंतु १८ मार्चला त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी नातेवाईकांना समजताच त्यांनी देशातील स्वयंसेवी संघटनांशी संपर्क साधून विनोद यांचा मृतदेह मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.
समाजसेवक जतीन देसाई यांच्या प्रयत्नातून तब्बल ४२ दिवसांनी विनोद यांचा मृतदेह वाघा बॉर्डरमार्गे भारतात आणण्यात आला. विमानाने अहमदाबादपर्यंत आणून पुढे रुग्णवाहिकेतून अस्वली येथे मंगळवारी (ता.३०) रात्री उशिरा मृतदेह आणण्यात आला.
सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बुधवारी विनोद कोल यांच्यावर हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती विनोद यांचा भाऊ गणपत बुजड यांनी दिली. विनोद याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, चार मुली असा परिवार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.