Mumbai News: टँकरखाली चिरडून विवाहितेचा मृत्य; चालक फरार
mumbai Accidnetsakal

Mumbai News: टँकरखाली चिरडून 23 वर्षीय विवाहितेचा मृत्य; चालक फरार

Published on

Bhiwandi News: पतीसोबत दुचाकीवरून घरी येण्यासाठी निघालेल्या विवाहितेचा टँकरखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. १६) नदीनाका परिसरात घडली. याप्रकरणी फरारी टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शबनम रमजान अन्सारी (२३) असे मयत विवाहितेचे नाव आहे. शबनम ही पती रमजान ताहीर अन्सारी याच्यासह मीठपाड्यात राहते. गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास दाम्पत्य आसरा हॉटेलच्या समोर पोहचले असता टँकरने दुचाकीला धडक दिली.

Mumbai News: टँकरखाली चिरडून विवाहितेचा मृत्य; चालक फरार
Accidnet News: मासेमारी करणाऱ्या बोटीला मालवाहू जहाजाची धडक

रमजान पत्नीसह खाली पडला. टँकरच्या उजव्या बाजूचे मागील चाक शबनमच्या पायावरून व हातावरून गेल्याने ती गंभीर जखमी झाली. अतिरक्‍तस्रावामुळे तिचा मृत्‍यू झाल्‍याचे शासकीय स्व. इंदिरा गांधी रुग्णालयातील डॉक्‍टरांनी सांगितले. निजामपुरा पोलिस घटनेचा तपास करत आहेत.

Mumbai News: टँकरखाली चिरडून विवाहितेचा मृत्य; चालक फरार
Train Accidnet: धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू; तोल जाऊन तो रेल्वे...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.