तळागाळातून म्हस्के पुढे आले आहेत. विक्रमी मतांनी त्‍यांचा विजय होईल,’’ असा विश्‍वास त्‍यांनी व्यक्‍त केला.
Eknath Shinde thane loksabha sakal

Eknath Shinde: धर्मवीरांच्या बालेकिल्ल्यात भगवा फडकत राहील

ऐरोलीतील प्रचार रॅलीत मुख्यमंत्री शिंदेंचे प्रतिपादन
Published on

Navi Mumbai News: ठाणे लोकसभा हा ऐतिहासिक मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून रामभाऊ म्हाळगी, राम कापसे, जगन्नाथ पाटील, स्वर्गीय प्रकाश परांजपे यांनी नेतृत्व केले आहे.

तर स्वर्गीय माँ साहेब यांचे ठाण्यावर खूप प्रेम होते. धर्मवीर आनंद दिघे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे लोकसभेवर महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्यारूपाने शिवसेनेचा भगवा पुन्हा फडकेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐरोलीतील प्रचार रॅलीत शुक्रवारी (ता. १७) व्यक्‍त केला.

तळागाळातून म्हस्के पुढे आले आहेत. विक्रमी मतांनी त्‍यांचा विजय होईल,’’ असा विश्‍वास त्‍यांनी व्यक्‍त केला.
Ekanth Shinde: विद्यमान खासदारांना नकार मुख्यमंत्र्यांना पडणार महागात?; वाचा कसा होणार शिंदेंना तोटा

महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅली ऐरोली विधानसभा मतदारसंघात काढण्यात आली. यात मुख्यमंत्री शिंदे सहभागी झाले होते. त्यांच्यासमवेत आमदार प्रताप सरनाईक, उपनेते विजय नाहटा, जिल्हाप्रमुख विजय चौगुले, संपर्कप्रमुख किशोर पाटकर, युवासेनेचे ममित चौगुले यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

तळागाळातून म्हस्के पुढे आले आहेत. विक्रमी मतांनी त्‍यांचा विजय होईल,’’ असा विश्‍वास त्‍यांनी व्यक्‍त केला.
Nashik Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या बॅगमध्ये जीवनावश्यक वस्तू; नाशिकमध्ये निवडणूक आयोगासह भरारी पथकाकडून तपासणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘नवी मुंबईतील गरजेपोटी बांधलेली घरे, घरांसाठी वाढीव एफएसआय देण्यासाठी आम्ही धोरणात्मक निर्णय घेतला. त्यामुळे आगामी काळात नवी मुंबईचा अधिक झपाट्याने विकास होईल. मोदी सरकारची दहा वर्षांची आणि अडीच वर्षांत राज्यात झालेली विकासकामे पाहता जनता महायुतीच्या उमेदवाराला विजयी करेल,’’ असा विश्‍वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्‍त केला.

नरेश म्हस्के यांच्या प्रचार रॅलीला मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांचा प्रचंड मताधिक्क्‍यांनी विजय होईल, असे शिवसेना उपनेते विजय नाहटा म्‍हणाले. जिल्हाप्रमुख विजय चौगुले म्‍हणाले, ‘‘नरेश म्हस्के यांचा राजकीय प्रवास हा कष्टातून निर्माण झाला आहे. तळागाळातून म्हस्के पुढे आले आहेत. विक्रमी मतांनी त्‍यांचा विजय होईल,’’ असा विश्‍वास त्‍यांनी व्यक्‍त केला.

तळागाळातून म्हस्के पुढे आले आहेत. विक्रमी मतांनी त्‍यांचा विजय होईल,’’ असा विश्‍वास त्‍यांनी व्यक्‍त केला.
Nashik Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या बॅगमध्ये जीवनावश्यक वस्तू; नाशिकमध्ये निवडणूक आयोगासह भरारी पथकाकडून तपासणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.