Railway News: फलाटांवरील प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची म्हणत न्यायालयाने फेटाळली याचीका!
railway sakal

Railway News: फलाटांवरील प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची म्हणत न्यायालयाने फेटाळली याचिका!

Published on


मुंबईतील रेल्वेस्थानकांमधील फलाटांवर असलेल्या वर्दळीमुळे प्रवाशांना नीट चालायला मिळत नाही.

त्यामुळे व्यवसायापेक्षा प्रवाशांची सुरक्षितता महत्त्वाची असून लाखो प्रवाशांचा जीव धोक्यात घालता येणार नसल्याचे निरीक्षण नोंदवताना दादर रेल्वे स्थानकातील स्टॉलधारकाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

Railway News: फलाटांवरील प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची म्हणत न्यायालयाने फेटाळली याचीका!
Mumbai News: टँकरखाली चिरडून 23 वर्षीय विवाहितेचा मृत्य; चालक फरार

दादर रेल्वेस्थानकात प्रवाशांची प्रचंड वर्दळ असते. या स्थानकातील फलाट क्रमांक ९ व १० वरील फुटओव्हर ब्रिजजवळ असलेला रुक्मणी अग्रवाल यांचा स्टॉल दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पाच वेळा नोटीस बजावली होती.

या नोटिशीला याचिकाकर्ता अग्रवाल यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर न्यायालयाचे न्या. संदीप मारणे आणि न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत खंडपीठाने प्रवाशांचे हित लक्षात घेता याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावली आहे.

Railway News: फलाटांवरील प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची म्हणत न्यायालयाने फेटाळली याचीका!
Mumbai Loksabha: गृहनिर्माण चळवळीला फडणवीसांनी गती दिली, दरेकरांनी केले कौतूक

न्यायालय काय म्हणाले...
याचिकाकर्त्यांच्या हितापेक्षा प्रवासी सुरक्षा महत्त्वाची आहे. सार्वजनिक आरोग्याच्या नावाखाली स्टॉलधारकाला लाखो प्रवाशांचा जीव धोक्यात घालू देणार नाही.

फलाटावर प्रवाशांना सुरक्षितपणे ये-जा करण्यासाठी प्रशासनाने स्टॉल दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेतला असेल, तर न्यायालय हस्तक्षेप करणार नाही.

Railway News: फलाटांवरील प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची म्हणत न्यायालयाने फेटाळली याचीका!
Mumbai Loksabha: मुंबईची लढत का आहे इतकी इंटरेस्टिंग? वाचा संपूर्ण आकडेवारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.