Crime News: चोरीच्या गुन्ह्यांत ४० वर्षांच्या नर्सला अटक, वाचा काय आहे प्रकरण
crimesakal

Crime News: चोरीच्या गुन्ह्यांत ४० वर्षांच्या नर्सला अटक, वाचा काय आहे प्रकरण

Published on

Mumbai Crime : चोरीच्या गुन्ह्यात दीपाली सुमुख दफ्तरे या ४० वर्षांच्या नर्सला पवई पोलिसांनी अटक केली. ती सध्या पोलिस कोठडीत आहे. कर्जबाजारी झाल्याने तिने ही चोरी केली होती. (andheri crime)

Crime News: चोरीच्या गुन्ह्यांत ४० वर्षांच्या नर्सला अटक, वाचा काय आहे प्रकरण
Pune Crime News : खराडीत मद्यपींची खुलेआम ‘जत्रा’;पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्कच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

एक महिन्यानंतर या चोरीचा पर्दाफाश करून पोलिसांनी नर्सला अटक केली. ७५ वर्षांची वयोवृद्ध तक्रारदार महिला पवईत राहत असून तिच्याकडे गेल्या अडीच वर्षांपासून दीपाली ही नर्स म्हणून काम करत होती.

त्यामुळे घरातील सर्व जबाबदारी तिच्यावर होती. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात तिने तिच्या कपाटात विविध कामांसाठी साडेतीन लाख रुपये ठेवले होते. जानेवारी महिन्यात तिला पाकिटातून तीन लाख रुपयांची रोकड चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यामुळे तिने पवई पोलिसांत चोरीची तक्रार केली होती. पोलिसांनी घरातील सर्व नोकरांसह दोन्ही नर्सची चौकशी सुरू केली होती.

Crime News: चोरीच्या गुन्ह्यांत ४० वर्षांच्या नर्सला अटक, वाचा काय आहे प्रकरण
Nashik Crime News : 2 चोऱ्यांमधील 4 संशयित ताब्यात; युनिट 1 शाखेची कारवाई

चौकशीदरम्यान दीपालीनेच ही चोरी केल्याचे उघडकीस आले. दीपालीने काही सोन्याचे दागिने खरेदी केले आहेत. घराची डागडुजी केली आहे, मोठ्या प्रमाणात महागडी शॉपिंग केले आहे.

हा प्रकार या तक्रारदार महिलेच्या लक्षात येताच तिने पोलिसांना दीपालीवर संशय असल्याचे सांगितले होते. दीपाली ही कर्जबाजारी झाली होती, त्यामुळे तिने ही चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

Crime News: चोरीच्या गुन्ह्यांत ४० वर्षांच्या नर्सला अटक, वाचा काय आहे प्रकरण
Nashik Bribe Crime : लासलगावच्या पोलिस नाईकास 5 हजारांची लाच घेताना अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.