महापालिकेचे ११२ अधिकारी, कर्मचारी सेवा निवृत्त

महापालिकेचे ११२ अधिकारी, कर्मचारी सेवा निवृत्त

Published on

महापालिकेचे ११२ अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : ठाणे महापालिकेतून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. एप्रिल महिन्यात पालिकेच्या सेवेतून ३८ अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्यात आता मेमध्ये तब्बल ११२ अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याची माहिती समोर आली आहे.

ठाणे महापालिकेच्या सेवेत २०१५ ते डिसेंबर २०२३ पर्यंत १५०० हून अधिक कर्मचारी, अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यात २०२४ सुरू होताच पहिल्याच महिन्यात २७ कर्मचारी, अधिकारी हे सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर फेब्रुवारीत त्यात आणखी २३ जणांची भर पडली. त्यानंतर एप्रिलमध्ये तब्बल ३८ अधिकारी, कर्मचारी सेवा निवृत्त झाल्याची माहिती पालिकेने दिली. त्यानंतर आता मेमध्येही तब्बल ११२ अधिकारी, कर्मचारी सेवेतून निवृत्त झाले आहेत. यात ३१ सफाई कर्मचारी, १७ शिक्षक, ११ लिपिक, पाच कार्यकारी अभियंता, दोन प्राध्यापक, दोन मुख्याध्यापक आणि बिगारी, टेक्निशिअन, वाहनचालक, माळी अशा ४४ जणांचा समावेश आहे.

महापालिकेचा आकृतिबंध मंजूर झाला असला, तरीदेखील त्याची भरती प्रक्रिया अद्यापही राबवलेली दिसत नाही. यंदा जानेवारीत नव्याने सुमारे २५०० नवीन पदे भरली जाणार होती; परंतु आता मे महिना संपला तरीदेखील ही पदे भरण्यासाठी महापालिकेला मुहूर्त सापडलेला नाही; तर महापालिका शाळांतून निवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढत आहे. त्यातही मागील काही वर्षांपासून एका एका शिक्षकावर अतिरिक्त कार्यभार दिला जात आहे. मुख्याध्यापकांचीदेखील पदे मोठ्या संख्येने रिक्त आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.