पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे

पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे

Published on

पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे

सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. ६ : पनवेल महापालिकेला दोन महिन्यांनंतर अखेर हक्काचे आयुक्त मिळाले आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांची पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. आज नगरविकास खात्याने चितळे यांची नियुक्ती आदेश दिले.
पनवेल महापालिकेचे याआधीचे आयुक्त गणेश देशमुख यांची लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर मार्च महिन्यात बदली झाली होती. एकाच विभागात तीन वर्षांहून अधिक काळ काम केल्याचा फटका त्यांना बसला होता. त्यानंतर मंगेश चितळे यांची पनवेल आयुक्त म्हणून नियुक्त होण्याची चर्चा पनवेल शहरात रंगली होती; मात्र देशमुख यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागेवर नगरविकास खात्याने कोणालाही नियुक्त केले नाही. जवळपास अडीच महिने आयुक्त नसल्यामुळे आयुक्तपदाचा कारभार अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ यांच्या खांद्यावर सोपवण्यात आला होता. त्यानंतर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या नावांची चर्चा रोज सुरू होती. अखेर चितळे यांनी बाजी मारली. पनवेल नगर परिषद असताना चितळे हे पनवेल महापालिकेवर दोन वेळा नियुक्त होऊन गेले आहेत. एका वेळेस चितळे यांनी पनवेल नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून कामकाज पाहिले आहे, तसेच त्यांच्याच काळात पनवेल नगर परिषदेचे महापालिकेत रूपांतर झाले. त्यामुळे आता आयुक्त म्हणून काम करताना चितळे यांना काही राजकीय नेते आणि समस्या नवीन नसल्याने त्यांचे सर्वांसोबत असणारे सलोख्याचे संबंध पाहता पनवेलकरांना ते जवळचे अधिकारी वाटणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.