यंदाच्या पावसातही मुंबईची होणार तुंबई?  बहुतांश नाल्यांची सफाई अर्धवट!
Mumbai Rain: sakal

Mumbai Rain: यंदाच्या पावसातही मुंबईची होणार तुंबई? बहुतांश नाल्यांची सफाई अर्धवट!

नाल्यांमध्ये कचरा जाऊ नये यासाठी जाळ्या लावण्याचा पालिकेचा विचार होता |The municipality was thinking of installing nets to prevent garbage from going into the drains
Published on

Mumbai News: लोकसभा निवडणुकीमुळे मुंबईतील नालेसफाईच्या कामांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यातच आता पावसाळा कधीही सुरू होण्याची शक्यता आहे. कंत्राटदारांनी नालेसफाईच्या कामाकडे दुर्लक्ष केले असून मुंबईतील बहुतांश नाल्यांची सफाई कामे अर्धवट असून मुंबई तुंबण्याचा धोका आहे.

पावसाळा तोंडावर आला असून पालिका प्रशासन नालेसफाईबाबत दावे करत आहे, मात्र ते दावे फोल असल्याची टीका राजकीय पक्षांकडून केली. अजूनही मोठ्या नाल्यांसह विभागांतर्गत छोट्या नाल्यांचीही सफाई झाली नसल्याची तक्रार नागरिकांची आहे. याबाबत विविध राजकीय नेत्यांनीही टीका केली आहे.

यंदाच्या पावसातही मुंबईची होणार तुंबई?  बहुतांश नाल्यांची सफाई अर्धवट!
Mumbai Mega Block: 'या' दिवशी असणार तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, नागरिकांचे होणार हाल

गाळाचे राजकारण
मुंबईतील नद्या आणि नाल्‍यांमधील गाळ काढण्‍यात आला तर काही नाले अजूनही गाळात आहेत. पालिकेचे वरिष्ठ अधिकारी शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरांतील नाल्‍यांतून गाळ काढण्‍याच्‍या कामांची पाहणी आणि तपासणीची जबाबदारी दिली होती. मात्र निवडणुकीमुळे ते शक्य झाले नाही. यामुळेच कंत्राटदारांनी कामचुकारपणा केला आहे.

प्लास्टिक कचरा अजूनही नाल्यात
नाल्यामध्ये थर्माकोल, प्लास्टिक पिशव्या, फर्निचर, रबर, रॕपर्स अशा विविध प्रकारच्या तरंगत्या वस्तूंनी नाले भरले आहेत. प्लास्टिकवर बंदी असूनही अनेकांकडून प्लास्टिकचा कचरा नाल्यात टाकताना दिसून येतात. त्यामुळे नाल्यातील पाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण होण्याचा धोका आहे.

यंदाच्या पावसातही मुंबईची होणार तुंबई?  बहुतांश नाल्यांची सफाई अर्धवट!
Karnatak Maharasthra Row: कर्नाटकाच्या बसवर 'जय महाराष्ट्र'चा एल्गार

भरती आणि जोरदार पावसाचा धोका
मुंबईत यावेळी जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याचा इशारा हवानान खात्याने दिला आहे. त्यामुळे मोठी भरती आणि जोराचा पाऊस एकाच वेळी आल्यास त्याचा फटका मुंबईला बसण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणजेच मुंबई तुंबण्याचा धोकाही वर्तवला जात आहे.

नाल्यांवर जाळ्या नाहीत
नाल्यांमध्ये कचरा जाऊ नये यासाठी जाळ्या लावण्याचा पालिकेचा विचार होता. मात्र अजूनही जाळ्या लावल्या गेल्या नाहीत. त्यामुळे कचरा मोठ्या प्रमाणात नाल्यामध्ये टाकला जात आहे.

यंदाच्या पावसातही मुंबईची होणार तुंबई?  बहुतांश नाल्यांची सफाई अर्धवट!
Latest Marathi Latest News : उपचार सुरु असताना रुग्ण ससूनमधून पळाला! पत्नीची तक्रार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.