मित्रपक्षांना मंत्रिमंडळात नगण्य स्थान; महाराष्ट्रातील पराभवाचा परिणाम?
Maharashtra Politicssakal

Maharashtra Politics: मित्रपक्षांना मंत्रिमंडळात नगण्य स्थान; महाराष्ट्रातील पराभवाचा परिणाम?

Modi cabinate News: शिंदे गटाकडे कोणतीही यंत्रणा नसल्याने त्यांना उमेदवारांना योग्य मदत करता आली नाही, असे पक्षाला वाटते
Published on

Mumbai News: महाराष्ट्रातला पराभव भाजपच्या जिव्हारी लागला हे स्पष्ट होतेच; समन्वयाचा अभाव होता, असे विधान करत देवेंद्र फडणवीस यांनी नाराजीला वाटही करून दिली होती. आज (ता. ९) मित्रपक्षातील शिंदेसेनेला स्वतंत्र कार्यभाराचे राज्यमंत्रिपद आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला काहीही न देता भाजपने जे सांगायचे ते सांगितले आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाने कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केल्यानंतर ती नाकारली गेली. अन्य मित्रपक्षांना जो न्याय तोच तुम्हाला असे सांगत राष्ट्रवादीच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले.

शिंदे गटाला सात खासदार निवडून आले असताना त्यांना जे दिले त्याहून जास्त राष्ट्रवादीला देणे शक्य नसल्याचे सांगण्यात आल्याचेही समजते. शिंदे गटालाही कॅबिनेट मंत्रिपदाची अपेक्षा होती; मात्र ती मान्य केली गेली नाही. भाजपने प्रचंड मदत केली; पण शिंदे गटाकडे कोणतीही यंत्रणा नसल्याने त्यांना उमेदवारांना योग्य मदत करता आली नाही, असे पक्षाला वाटते.

 मित्रपक्षांना मंत्रिमंडळात नगण्य स्थान; महाराष्ट्रातील पराभवाचा परिणाम?
Ajit Pawar : राज्यमंत्रिपद नको, कॅबिनेटच हवे राष्ट्रवादी काँग्रेस ठाम, विस्ताराची वाट पाहणार

भाजप लढत असलेल्या खासदारकीच्या जागांवर शिंदे गटाचे आमदार मते देण्यात फार सरस ठरले नाहीत आणि अजित पवार गटाला त्यांची मतेही राखता आली नाहीत, असे मानले जात आहे. कमी आमदार असताना मुख्यमंत्रिपद दिले.

शिंदे गटाने ते समजून घेत कोणतीही अवाजवी मागणी केलेली नाही, असे पक्षातर्फे स्पष्ट करण्यात येत आहे. मात्र, भाजप मतहस्तांतरण या विषयावर लवकरच चर्चा करेल, असे मानले जाते आहे. भाजपने मंत्रिमंडळात अत्यल्प प्रतिनिधित्व देत आगामी राजकारणाची चुणूक दाखवल्याचे मानले जाते.

 मित्रपक्षांना मंत्रिमंडळात नगण्य स्थान; महाराष्ट्रातील पराभवाचा परिणाम?
Ajit Pawar : दलित-मुस्लिमांची नाराजी हटवा;राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत आमदारांना सूचना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.