Mumbai Accident: चिंचोटी-भिवंडी रस्त्यावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेत एक ठार
Mumbai Accidentsakal

Mumbai Accident: चिंचोटी-भिवंडी रस्त्यावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेत एक ठार

Vasai Accident Latest update: चिंचोटी-भिवंडी या रस्त्यासाठी या परिसरातील नागरिकांनी अनेक आंदोलने केली आहेत.
Published on

Mumbai Accident News: वसई तालुक्यातील धोकादायक असलेल्या चिंचोटी-भिवंडी रस्त्यावर टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली. कोल्ही येथे राहणारा राहुल कुमार (वय १८) सोमवारी (ता. २४) सकाळी कामावर जाण्यासाठी चिंचोटी-भिवंडी रस्त्यावरून पायी निघाला होता.

Mumbai Accident: चिंचोटी-भिवंडी रस्त्यावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेत एक ठार
Mumbai News : ढोर,ककय्या, कंकय्या आणि डोहर समाजाला आपल्या पारंपरिक कामाला लागले मुकावे

भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव टेम्पोने रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या नादात पुढे चालत असलेल्या राहुल कुमार याला पाठीमागून धडक देत चिरडले. या अपघातात राहुल याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, चिंचोटी-भिवंडी या रस्त्यासाठी या परिसरातील नागरिकांनी अनेक आंदोलने केली आहेत.

मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी अपघाती मृत्यू होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यातच या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधीही मंजूर करण्यात आला आहे, पण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्ती केली जात नसल्याने खड्डेमय रस्त्यात वारंवार अपघात होऊन नाहक बळी जात आहेत.

Mumbai Accident: चिंचोटी-भिवंडी रस्त्यावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेत एक ठार
Bus Accident : मंचर जवळ दोन एसटी गाड्यांचा अपघात: तीन प्रवासी जखमी

पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचल्याने वाहनचालकांना या खड्याचा अंदाज येत नसल्याने अपघातांमध्ये वाढ झाली असून याप्रकरणी माजी सरंपच दिनेश म्हात्रे, रमेश जाधव, रविंद्र म्हात्रे, पुष्पा जाधव यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Mumbai Accident: चिंचोटी-भिवंडी रस्त्यावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेत एक ठार
Buldana Accident News : भाविक महिलांची क्रुझर ट्रॉलीला धडकली ;श्रींचे दर्शनास येत होते शेगावला,दहा जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.