Cyber Crime Complaint
Cyber Crime Complaintesakal

Mumbai Crime: 'एडिट अँड सजेस्ट’चा वापर करत भामट्यांचा वृद्धेला गंडा, वाचा नक्की काय घडलं?

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या वृद्धेच्या मुलाने माटुंगा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
Published on

Crime News : गुगलवर ‘एडिट अँड सजेस्ट’ हा पर्याय वापरून ऑनलाईन भामटे नागरिकांची फसवणूक करत आहेत, हे दर्शवणारी कारवाई माटुंगा पोलिसांनी केली. एका वृद्धेची पाच लाखांची मुदत ठेव आणि त्यावर आलेले सुमारे लाखभर रुपयांचे व्याज परस्पर आपल्या खात्यात लाटणाऱ्या चार भामट्यांना माटुंगा पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वृद्धेची खालसा महाविद्यालय परिसरातील एसबीआय शाखेत पाच लाखांची मुदत ठेव होती. ती परिपक्व झाली, मात्र ती रक्कम खात्यावर जमा झाली नव्हती. याबाबत विचारपूस करण्यासाठी या वृद्धेने गुगलद्वारे बँक शाखेचा नंबर मिळवला. प्रत्यक्षात हा दूरध्वनी क्रमांक बँकेचा नसून भामट्यांचा होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या वृद्धेच्या मुलाने माटुंगा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.

Cyber Crime Complaint
PM Modi In Mumbai: मिशन विधानसभा! पीएम मोदी आज मुंबईत, 29 हजार कोटींच्या विकास कामांचे लोकार्पण

त्यानुसार गुन्हा नोंदवत वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तपास सुरू केला. संबंधित खात्यातील रक्कम अनेक बॅंक खात्यांत वळती करण्यात आल्याचे पोलिसांना आढळले.

ही खाती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पथकाने राहुल उमाळे, अरबाज शेख, अमीन शेख आणि रहिम शेख यांना मुंबई व ठाणे जिल्ह्यातून अटक केली. या आरोपींकडून मोबाईल, सिमकार्ड, विविध बॅंकांची कार्ड आणि ९५ हजारांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.

Cyber Crime Complaint
Nashik Crime News : गुजरातमधून मुख्य सुत्रधाराच्या मुसक्या आवळल्या; चांदवड एक्सईज वाहन अपघात प्रकरणी तिसरी अटक!

अशी होते फसवणूक
ग्राहकांना अचूक माहिती पुरवता यावी, या उद्देशाने गुगलने ‘एडिट अँड सजेस्ट’ हा पर्याय दिला आहे. मात्र या पर्यायाचा वापर करून हे भामटे विविध शासकीय-खासगी आस्थापना, विविध सेवा पुरवणाऱ्या कंपन्या, बँका आदींच्या माहितीतील दूरध्वनी क्रमांक या पर्यायाद्वारे बदलतात. तेथे स्वतःचा संपर्क क्रमांक देतात.

या क्रमांकावर एखाद्या ग्राहकाने संपर्क साधल्यास त्याला बोलण्यात गुंतवून ऑनलाईन बँक व्यवहारांचे सर्व तपशील मिळवत टीमव्ह्युवरसारखी ॲप नकळत डाऊनलोड करण्यास भाग पाडतात. त्याद्वारे बँक खात्यातील जमा परस्पर आपल्याकडे वळती करतात.

Cyber Crime Complaint
Mumbai Accident News: ट्रकच्या धडकेत महिला ठार; शहरातील अवजड वाहनांचा प्रश्न ऐरणीवर, भिवंडीतील घटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com