Vivek Patil
Vivek Patilsakal media

Former MLA Vivek Patil: निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदारास अखेर ईडीचा जामीन मंजूर,'शेकाप'च्या आशा पल्लवित

ED case on vivek patil: माजी आमदार विवेक पाटील यांना अखेर ईडीचा जामीन मंजूर सीआयडीचा खटल्यामुळे जेलमध्येच राहणार
Published on

नवी मुंबई : कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी कारागृहात असणारे शेकापचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार विवेक पाटील यांना अखेर ईडीच्या गुन्ह्यात जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयात काही अटी आणि शर्ती तसेच ५० हजारांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला आहे. मात्र कर्नाळा बँकेच्या साडेपाचशे कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांच्याविरोधात राज्य गुन्हे विभागाचा (सीआयडी) खटला पनवेल सत्र न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणात जामीन बाकी असल्याने त्यांना कारागृहात राहावे लागणार आहे. परंतु याप्रकरणी पनवेल न्यायालयात जामीन अर्ज सादर केला आहे. त्यावर पुढच्या सुनावणी होणार आहे.

Vivek Patil
Kalyan Breaking News: नवी मुंबई पालिकेत कल्याण ग्रामीणमधील गावांचा समावेश; 'ती' १४ गावे कोणती?

कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या घोटाळ्यातून मनी लॉडिरिंग झाल्याच्या ठपका ठेवत विवेकानंद पाटील यांना १४ जून २०२१ रोजी ईडीने त्यांच्या निवासस्थानावरून अटक केली होती. सुरुवातीला ऑर्थर रोड कारागृहात ठेवले होते. ते सध्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात आहेत. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मनीष पितळे यांच्या यांच्या कोर्टात काही महिन्यांपासून सुनावणी सुरू होती. अखेर आज सुनावणीदरम्यान पाटील यांना काही अटी घालून जामीन मंजूर करण्यात आला. त्यानुसार पाटील यांना दर महिन्याला ईडीच्या कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे.

Vivek Patil
... तर २०४० पर्यंत १० टक्के मुंबई पाण्याखाली!

दरम्यान, आज शेकापचा जासई येथे वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील यांनी विवेक पाटील यांना जमीन मंजूर झाल्याची माहिती देताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या काळात पाटील यांना जामीन मंजूर होत असल्याने ते बाहेर आल्यास त्यामुळे शेकापला मोठा आधार मिळेल अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.