Thane: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील हातभट्टी उध्वस्त, गावठी दारू तयार करणाऱ्या व्यक्तीला अटक

Thane: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील हातभट्टी उध्वस्त, गावठी दारू तयार करणाऱ्या व्यक्तीला अटक

गुरुवारी केलेल्या कारवाईत वन कर्मचाऱ्यांनी एक हातभट्टी उद्ध्वस्त करून दारू तयार करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.
Published on

ठाणे शहर: गावठी दारू बनवण्यास बंदी असताना अजूनही काही भागांत अशा दारूची निर्मिती केली जात असल्याचे आढळून येत आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लपूनछपून असे प्रकार घडत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी वन विभाग सज्ज झाला असून गुरुवारी केलेल्या कारवाईत वन कर्मचाऱ्यांनी एक हातभट्टी उद्ध्वस्त करून दारू तयार करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.

रामू सातपुते (ता. ४९) असे त्याचे नाव आहे. या कारवाईत साहित्यही उद्ध्वस्त केले. वन परिक्षेत्र अधिकारी गणेश सोनटक्के यांनी ही माहिती दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.