Uddhav Thackeray in Thane
Uddhav Thackeray in Thaneesakal

Uddhav Thackeray in Thane: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ठाकरे गटाने कसली कंबर, उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, विधानसभेची तयारी सुरू

Thane Vidhansabha: आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ठाणे पुन्हा ताब्यात घेण्यासाठी शिवसनेच्या ठाकरे गटाने कंबर कसल्याचे दिसून येत आहे.
Published on

ठाणे: राम गणेश गडकरी रंगायतन येथे शिवसेनेच्या भगवा सप्ताहानिमित्त शनिवारी उद्धव ठाकरे ठाण्यात हजेरी लावणार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ठाणे पुन्हा ताब्यात घेण्यासाठी शिवसनेच्या ठाकरे गटाने कंबर कसल्याचे दिसून येत आहे.

Uddhav Thackeray in Thane
Uddhav Thackeray: "बाळासाहेब गेले तेव्हाच शिवसेना संपली...", नारायण राणेंचा ठाकरेंवर प्रहार; राजकारण पेटणार?

दोन वर्षांपूर्वी झालेल्या सत्तांतरानंतर आजही ठाण्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व असल्याचे लोकसभा निवडणुकीत स्पष्ट झाले. याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाने ठाण्यावर लक्ष केद्रींत केले आहे. शिवसेनेच्या भगवा सप्ताहानिमित्त उद्धव ठाकरे उद्या ठाण्यात येत आहेत. यावेळी त्यांच्या समवेत युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते-खासदार संजय राऊत ही उपस्थित राहणार आहेत.

Uddhav Thackeray in Thane
Uddhav Thackeray : भाजपपेक्षा काँग्रेससोबत ठाकरे अधिक सहज ; उपराष्ट्रपती, सोनिया गांधी व सुनीता केजरीवाल यांची घेतली भेट

महत्त्वाचे म्हणजे, छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यात उद्धव सेनेचा शिवसंकल्प मेळावा पार पडला होता. त्यानंतर दिल्ली दौऱ्यावर गेलेल्या उद्धव ठाकरे यांनी विविध पक्षातील नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन प्रदीर्घ चर्चा केली. या दौऱ्यानंतर शनिवारी ठाण्यात येणाऱ्या ठाकरेंची तोफ कोणावर धडाडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...