PM Modi vadhvan port
PM Modi vadhvan portesakal

PM Modi Visit Mumbai: वाढवण बंदराच्या भूमिपूजनाला विरोध,मोदींच्या दौऱ्यावेळी मच्छीमार संघटना काढणार ‘सरकारची प्रेतयात्रा’

Vadhavan Port Foundation: PM Modi's Mumbai Visit Meets Local Protest वाढवण बंदर उभारणीमुळे पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील ६० पेक्षा जास्त मच्छीमार गावांवर विपरीत परिणाम होणार असून लाखो मच्छीमार आपला व्यवसाय कायमस्वरूपी गमावणार आहेत.
Published on

भाईंदर, ता. २८ (बातमीदार) : वाढवण बंदराचे भूमिपूजन येत्या शुक्रवारी (ता. ३०) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या बंदराला येथील मच्छीमार संघटनांचा विरोध असून या भूमिपूजनाचा निषेध करण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय उत्तन येथे झालेल्या अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

भूमिपूजन कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी बुधावारी (ता. २८) तातडीची सभा उत्तन येथे बोलाविण्यात आली होती. या सभेला मुंबई, ठाणे आणि पालघर येथील मच्छीमार सहकारी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. बंदरामुळे मच्छीमारांचे कोणकोणत्या पद्धतीने नुकसान होणार आहे; याची सविस्तर चर्चा या बैठकीत करण्यात आली. भूमिपूजन कार्यक्रमाला एकमताने विरोध करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

यामध्ये वाढवण किनाऱ्यावर होणाऱ्या ‘सरकारच्या प्रेतयात्रा’ आंदोलनात मोठ्या संख्येने मच्छीमार सहभागी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. वसई येथील मच्छीमार भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या विरोधात वसई तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. उत्तन, मढ, मर्वे, गोराई येथील मच्छीमार समुद्रात जलसमाधी घेऊन आणि काळे झेंडे दाखवून विरोध करणार असल्याची माहिती समितीचे कार्याध्यक्ष बर्नार्ड डिमेलो यांनी यावेळी दिली.

PM Modi vadhvan port
वाढवण बंदराच्या विरोधासाठी मतदानावर बहिष्काराचा निर्धार

राज्यातील सर्व किनारपट्ट्यांवरून विरोध

वाढवण बंदरासाठी समुद्रातील एकूण ३० हजार एकर क्षेत्र मासेमारीसाठी प्रतिबंधित करण्यात येणार असल्याचे भारतीय मत्स्यकी संशोधन संस्थेच्या अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे डहाणू, मुंबई, ठाणे, उत्तन, वसई, अर्नाळा, सातपाटी येथील मासेमारी व्यवसायदेखील बाधित होणार आहे. यासाठी प्रकल्पाला राज्यातील सर्व किनारपट्ट्यांवरून विरोध होणार असल्याची माहिती डिमेलो यांनी दिली.

वाढवण बंदर उभारणीमुळे पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील ६० पेक्षा जास्त मच्छीमार गावांवर विपरीत परिणाम होणार असून लाखो मच्छीमार आपला व्यवसाय कायमस्वरूपी गमावणार आहेत. मच्छीमार समाज आजतागायत कधीच विकासाच्या आड आला नाही; परंतु विकासाच्या नावाखाली मच्छीमारांचा व्यवसाय नष्ट होत असेल तर ते कदापि सहन केले जाणार नाही आणि अशा विध्वंसक प्रकल्पांना विरोध हा समाज शेवटपर्यंत करीत राहणार आहे.

- संजय कोळी, सरचिटणीस, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...