navi mumbai murder case
navi mumbai murder caseesakal

Navi Mumbai Murder case: 'मित्रांना ठार करून अभयारण्यात फेकून दिलं..' नवी मुंबईतील दुहेरी हत्याकांडाची अखेर उकल

Real Estate Agent Double Murder Case: नवी मुंबईतील दुहेरी हत्याकांडाची अखेर उकल, पोलिसांकडून पाच आरोपींना अटक; एकाचा शोध सुरू
Published on

नवी मुंबई, ता. २८ (वार्ताहर) : नेरूळमधील दोन रिअल इस्टेट एजंटच्या हत्येचे गूढ उकलण्यात अखेर नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. या दुहेरी हत्याकांडातील फरारी असलेल्या एका आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती नवी मुंबईचे अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आरोपी विठ्ठल नाखाडे याने मृत सुमित जैन (वय ३९) याच्याशी संगनमत करून आपला दुसरा सहकारी अमिर खानजादा (वय ४२) याची बुधवारी (ता. २१) नेरूळ येथे आपल्या गाडीतच गोळ्या घालून हत्या केली व त्याचा मृतदेह कर्नाळा येथील अभयारण्यात फेकून दिला. अमिरच्या हत्येत आपला सहभाग आढळून येऊ नये; तसेच पोलिसांना गुंगारा देण्यासाठी हत्येत सहभागी झालेला दुसरा इस्टेट एजंट सुमित जैन याने स्वत:च्या पायावर खोपोली येथे गोळी मारून घेतली. मात्र स्वत:ला जखमी करण्याच्या नादात सुमित जैन याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.

यादरम्यान हत्येच्या सुपारीचे कबूल केलेले ५० लाख देण्याच्या वादातून आरोपींनी सुमितच्या पायावर आणि शरीरावर चाकूने वार केले. यामध्ये सुमितचाही मृत्यू झाला. दरम्यान, या दोन्ही रिअल इस्टेट एजंटच्या मिसिंगची तक्रार गुरुवारी (ता. २२) नेरूळ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. यादरम्यान पोलिसांना आरोपींची कार खोपोली येथे बेवारस स्थितीत आढळून आली. या कारमध्ये बंदुकीच्या पुंगळ्या आणि रक्ताचे डाग आढळून आले. त्यानंतर सुमित जैन या इस्टेट एजंटचा मृतदेह खोपोली-पेण मार्गावरील गागोदे गावाजवळ सापडला.

परंतु, अमिर खानजादा याचा थांगपत्ता लागत नसल्यामुळे पोलिसांनी आपली शोधमोहीम अधिक तीव्र करून या हत्येचा मास्टरमाईंड असलेला आरोपी विठ्ठल नाकाडे (वय ४३) याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी या दुहेरी हत्याकांडात सहभागी असलेले आरोपी जयसिंग मुदलीयार (वय ३८), आनंद क्रूझ (वय ३९), वीरेंद्र कदम (२४), अंकुश सिताफे (३५) यांना ताब्यात घेतले.

मृत व्यक्तीच्या जमिनीची विक्री

मृत सुमित जैन व आरोपी विठ्ठल नाकाडे यांनी पाली येथील एका जमिनीचा सौदा केला होता. या जमिनीचा मूळ मालक कोविडमध्ये मृत झाल्याने त्या ठिकाणी बनावट व्यक्तीला जमिनीचा मालक म्हणून उभा करून व जमिनीचे खोटे कागदपत्रे ही जमीन साडेतीन कोटीला एका व्यक्तीला त्यांनी विकली होती. या व्यवहारात अमिर खानजादा याने आपला हिस्सा जैन व नाकाडे यांच्याकडे मागितला होता. या वेळी झालेल्या वादातून सुमित जैन व विठ्ठल नाकाडे यांनी अमिरच्या हत्येचा कट रचला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...