Thane Government Hospital: ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय होणार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, खाटांची संख्या तीन पटीने वाढणार
Thane To Get New Super Specialty Hospital With Advanced Medical Facilities
ठाणे : खासगी रुग्णालयात उपचार घेणे गरिबांच्या आवाक्याबाहेर असते. अशा रुग्णांना शासकीय रुग्णालयाचा मोठा आधार मिळतो. ही बाब लक्षात घेता ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाने आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करण्याचे पाऊल उचलले आहे. हे रुग्णालय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होण्याबरोबरच जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयांच्या खाटांची ९७६ वरून १,१८४ होणार आहे. राज्य सरकारने याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात तीन पटीने खाटांची संख्या ३,३३० इतकी वाढणार आहे.
जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना चांगले उपचार मिळावेत, यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाने कंबर कसली आहे. सिव्हिल रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आदी सरकारी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे; मात्र काही वेळा रुग्णाला ॲडमिट करताना खाटा उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे रुग्णाला ॲडमिट करून घेताना रुग्णालयाची तारेवरची कसरत होते; मात्र रुग्णांची आबाळ होणार नाही याची काळजी आरोग्य विभागाने घेतली आहे. जिल्ह्यात सध्या ९७६ खाटा उपलब्ध असून, यामध्ये १,१८४ नवीन खाटांना मंजुरी दिल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.
ठाणे जिल्हा रुग्णालयाचे रूपांतर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये होत आहे. सध्या रुग्णालयाची बेडची संख्या ३३६ आहे, तर नवीन होणाऱ्या सुपर स्पेशालिटी खाटांची संख्या ९०० होणार आहे. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात १०० बेड आहेत. आणखी २०० खाटांना मंजुरी मिळाली आहे. याचप्रमाणे उपजिल्हा रुग्णालय अंबरनाथ येथे आता ५० बेडची सोय असून यामध्ये आणखी १०० बेडला मान्यता मिळाली आहे. उपजिल्हा रुग्णालय बदलापूरमध्ये ३० बेड आहेत. नवीन ५० खाटांना मान्यता मिळाली आहे. तसेच, नवीन २०० बेडचा श्रेणीवर्धन प्रस्ताव अणि २०० खाटांचा महिला व बालरुग्णालय प्रस्ताव पाठवला आहे.
डोळखांब आरोग्य केंद्र होणार ग्रामीण रुग्णालय
ठाणे जिल्हा शहरी ग्रामीण अणि दुर्गम आदिवासी भागात विभागला आहे. त्यामुळे जिल्ह्यात बेडची संख्या जास्तीत जास्त वाढवण्यासाठी प्रस्ताव पाठवले आहेत. पंडित भीमसेन जोशी मिरा भाईंदर रुग्णालयात २००, अंबाडी फाटा ग्रामीण रुग्णालय पडघा, कसारा, किन्हवली, मंगरूळ, गोवेली, खर्डी टोकवडे आदी रुग्णालयात बेडचे नवीन प्रस्ताव पाठवले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र डोळखांब ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी मिळाली आहे.
जिल्ह्यात लोकसंख्या वाढत असून, काही वेळा रुग्णांना मुंबईत उपचारासाठी न्यावे लागते; परंतु जिल्ह्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमुळे सामान्य रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे. अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये अवघड जोखमीच्या खर्चिक शस्त्रक्रिया करणे सोयीचे होणार आहेच; पण त्याचबरोबर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात बेडची संख्या वाढल्याने रुग्णांची धावपळ कमी होण्यास मदत मिळेल.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.