मुंबई
BKC POD Taxi : बीकेसीतील पाॅड टॅक्सी मार्गी लागणार; बीकेसीतील प्रवाशांना दिलासा
एमएमआरडीएकडून प्रकल्पासाठी साई ग्रीन मोबिलिटीची नियुक्ती
मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलात उभारण्यात येणाऱ्या पाॅड टॅक्सी प्रकल्पाचे काम आता मार्गी लागणार आहे. त्यासाठी एमएमआरडीएने मे. साई ग्रीन मोबिलिटी प्रा. लि. या कंपनीची प्रकल्प संचलनासाठी (कन्सेशनेअर) म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे पाॅड ट्रक्सी सुरू झाल्यानंतर बीकेसीमध्ये ये-जा करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.