Mumbai Local News: येत्या १५ महीन्यात घावणार, पनवेल-कर्जत लोकल!
Mumbai Local News: येत्या १५ महीन्यात घावणार, पनवेल-कर्जत लोकल!sakal

Mumbai Local News: मोठी बातमी, येत्या १५ महीन्यात घावणार पनवेल-कर्जत लोकल!

Panvel Karjat Local: रेल्‍वे कॉरिडॉरचे काम युद्धपातळीवर; अंदाजित खर्च दोन हजार ७८२ कोटी
Published on

Mumbai Local News: पनवेल-कर्जत रेल्वे लिंक रोड १५ महिन्यांत कार्यान्वित होणार असून नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरच्या बोगद्यातून रूळ टाकण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. प्रकल्पाचे काम निम्म्याहून अधिक पूर्ण झाले असून डिसेंबर २०२५ मध्ये हा मार्ग कार्यान्वित होण्याची शक्‍यता आहे. या मार्गामुळे सीएसएमटी ते कर्जत दरम्यानचा प्रवासाचा वेळ २० मिनिटांनी वाचणार असल्याची माहिती ‘मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन’ने दिली आहे.


प्रवाशांच्या सुविधेसाठी २०१५ च्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पनवेल-कर्जत रेल्वे मार्गिकेच्या प्रकल्पास हिरवा कंदील दाखवला होता. ‘मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन’च्या माध्यमातून या प्रकल्पाच्या उभारणीसाठी मंजुरी दिली होती, परंतु कोरोनामुळे प्रकल्पाची निविदा प्रक्रिया आणि प्रत्यक्ष कामे खोळंबली. 

Mumbai Local News: येत्या १५ महीन्यात घावणार, पनवेल-कर्जत लोकल!
Mumbai Local: ज्येष्ठ नागरिकांना आता लोकलमध्ये धक्के खात प्रवास करण्याची गरज नाही; कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश

जानेवारी २०२१ नंतर प्रत्‍यक्षात काम सुरू झाले. या रेल्वे कॉरिडॉरसाठी अंदाजे दोन हजार ७८२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये तीन बोगदे, दोन रेल्वे उड्डाणपूल, ४४ मोठे आणि छोटे पूल, १५ रस्त्यांखालील पूल आणि सात रस्‍त्‍यांवरील उड्डाणपुलांचा समावेश आहे.


पनवेल-कर्जतदरम्‍यान नधाळ, वावरेली आणि किरवली असे तीन बोगदे आहेत. वावरेली बोगदा (२.६ किमी) हा संपूर्ण मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर बांधला जाणारा सर्वात लांब बोगदा आहे. या बोगद्यामध्ये बोगदा नियंत्रण, गिट्टी कमी ट्रॅक, वायूव्हिजन यंत्रणा, वीज आणि सार्वजनिक निर्वासित क्षेत्र असा आहे.

२९.६ किलोमीटर लांबीच्या या मार्गात पाच स्थानके असतील. पनवेल, मोहपे, चिकले, चौक आणि कर्जत अशी स्थानकांची नावे आहेत. त्यामुळे मुंबई ते कर्जतदरम्यान लोकल गाड्या पनवेलमार्गे चालवता येणार आहेत. सध्याच्या कल्याणमार्गे जाणाऱ्या मार्गाच्या तुलनेत सीएसएमटी ते कर्जत हे अंतर २० मिनिटांनी कमी होईल. सध्या एकूण प्रवासात दोन तासांपेक्षा थोडा जास्त वेळ लागतो.

Mumbai Local News: येत्या १५ महीन्यात घावणार, पनवेल-कर्जत लोकल!
Mumbai Local News: मुंबईकरांची गणेश विसर्जन मिरवणूक दणक्यात! अनंत चतुर्दशीला 22 जादा लोकल; जाणून घ्या वेळापत्रक


पनवेल-कर्जत रेल्वे मार्गामुळे मुंबईला नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर मिळणार आहे. मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणाऱ्या २९.६ किमी लांबीच्या रेल्वे कॉरिडॉरमुळे कर्जत ते पनवेल आणि त्यापलीकडे प्रवास करणे सोपे आणि जलद होणार आहे. पनवेल-कर्जत दुहेरी रेल्वे लिंकमुळे नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील नागरिकांचा प्रवास जलद होणार आहे.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर ठाणे आणि कल्याण स्थानकांमधली गर्दी कमी होण्यास मदत होईल. कारण, कल्याण व त्यापुढील प्रवासी ठाण्यामार्गे पनवेलला जाण्याऐवजी या जलद मार्गाने प्रवासाला प्राधान्य देतील.

Mumbai Local News: येत्या १५ महीन्यात घावणार, पनवेल-कर्जत लोकल!
Mumbai Local Accident: पाय घसरून हात निसटला, फलाटाच्या गॅप मध्ये अडकली अन्..

तिसऱ्या मुंबईसाठी महत्त्‍वाचा दुवा
कर्जत-पनवेल रेल्‍वे कॉरिडॉर तिसरी मुंबई, नवी मुंबई विमानतळ बाधित क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण दुवा आहे. त्यामुळे या परिसरातील मालमत्तेच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. २०२४ च्या सुरुवातीपर्यंत प्रकल्पासाठी ५५ हेक्टरपेक्षा जास्त खासगी जमीन संपादित करण्यात आली आहे. ४.४ हेक्टर सरकारी जमीन आणि वन विभागाची नऊ हेक्टर जमीनदेखील संपादित करण्यात आली असून प्रकल्पाचे ५६ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे.

किरवली बोगद्याची खोदाई सुरू
किरवली बोगद्याच्या खोदाईचे काम गतवर्षी सुरू झाले. हा बोगदा खोदणे हे या प्रकल्पातील मोठे आव्हान होते. डिसेंबर २०२५ पर्यंत बांधकाम पूर्ण होऊन लोकल सेवा सुरू होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

Mumbai Local News: येत्या १५ महीन्यात घावणार, पनवेल-कर्जत लोकल!
Mumbai Local Train News: हार्बर लाईनवर वाहतुकीचा खोळंबा! पनवेलहून CSMT कढे जाणारी वाहतूक ठप्प

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.