ratan tata devendra fadnavis
ratan tata devendra fadnavisesakal

Ratan Tata Passes Away: "महाराष्ट्राची, देशाची ही मोठी हानी.." देवेंद्र फडणवीस यांची रतन टाटांना श्रद्धांजली

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "रतन टाटा (Ratan Tata Demise) एक यशस्वी उद्योजक तर होतेच. पण, त्यापलिकडे ते देशाला ठावूक होते. कायम समाजाचा विचार, माणुसकी आणि विनम्रतेचे ते मूर्तिमंत होते.
Published on

अवघ्या देशाला मानवतेच्या श्रीमंतीची अनुभूती देणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व उद्योगपती रतन टाटा आपल्यातून निघून गेले आहेत. त्यांच्या निधनाने मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला आहे. ते एक यशस्वी उद्योजक होतेच, पण त्यापलीकडेही ते देशाला ठाऊक होते. कायम समाजाचा विचार, माणुसकी आणि विनम्रतेचे ते मूर्तिमंत उदाहरण होते. शिक्षण, ग्रामोन्नती आणि कुपोषण, आरोग्याच्या क्षेत्रात त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. महाराष्ट्राची, देशाची ही मोठी हानी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.