Ratan Tata Passed Away: रतन टाटा हे एक जिवंत आख्यायिका होते.. CM शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची टाटांना आदरांजली
नैतिकता आणि उद्यमशीलता यांचा अपूर्व आणि आदर्श संगम रतन टाटा यांच्या ठायी होता. सुमारे १५० वर्षांची श्रेष्ठत्व आणि सचोटीची परंपरा असलेल्या टाटा समूहाची जबाबदारी यशस्वीरीत्या पेलणारे रतन टाटा हे एक जिवंत आख्यायिका होते. त्यांचा निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कणखरपणा टाटा समूहाला वेगळ्या औद्योगिक उंचीवर घेऊन गेला. ते भारताचा अभिमान होते. त्यांना मी आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. रतनजी टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
महान उद्योजक आणि तेवढेच थोर समाजसेवी रतन टाटा यांच्या जाण्याने अतीव दुःख झाले आहे. उद्योजक म्हणून त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहेच, त्याचवेळी राष्ट्रप्रेम, समाजसेवा आणि माणुसकीची मोठी परंपराही आपल्या मागे सोडली आहे. त्यांचे कुटुंबीय, तसेच त्यांचे लक्षावधी चाहते यांच्याबरोबर माझ्या सहवेदना आहेत.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री
भारतीय उद्योगविश्वात रतन टाटा हे नाव विश्वास आणि औदार्याचे प्रतीक आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी टाटा उद्योग समूहाची मूल्ये कायम राखली. त्यांच्या निधनामुळे समाजाप्रती आपले उत्तरदायित्व मानणारा उमद्या मनाचा उद्योगपती काळाच्या पडद्याआड गेला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
- सुप्रिया सुळे, खासदार
उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्याच्याशी माझे वैयक्तिक आणि जवळचे संबंध होते. त्यांच्यात नम्रता, साधेपणा होता. सचोटी आणि करुणा या मूल्यांना त्यांनी मूर्त रूप दिले. अर्थव्यवस्थेतील त्यांचे योगदान आणि रोजगारनिर्मितीमुळे असंख्य लोकांचे जीवन बदलले. आपण एक दूरदर्शी आणि दयाळू मार्गदर्शक गमावला आहे.
- नितीन गडकरी
रतन टाटा हे देशसेवेसाठी आयुष्य वाहणारे व्यक्तिमत्त्व होते. आपल्या उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी सेवा देण्याचे मोठे काम केले आहे. त्यांचे आपल्यातून जाणे ही दु:खद घटना आहे.
- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.