Mira-Bhayander Vidhansabha:  मिरा-भाईंदरमध्ये उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच

Mira-Bhayander Vidhansabha: मिरा-भाईंदरमध्ये उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच

Mumbai Latest Update : जिल्हाध्यक्षांसह सर्वच पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणात उमेदवारीसाठी मेहता यांच्याच नावाला पसंती दिली.
Published on

Latest Vidhansabha News: मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपकडून अद्याप उमेदवारी घोषित करण्यात आलेली नाही. पक्षात उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू असताना मिरा-भाईंदर शहर भाजपच्या संकल्प मेळाव्यात मात्र जिल्हाध्यक्षांसह सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नरेंद्र मेहता यांनाच उमेदवार मिळणार, अशी घोषणा केली आहे.

या मेळाव्याद्वारे पक्ष आपल्यासोबतच असल्याचे मेहता यांनी दाखवून दिले. उमेदवारीच्या शर्यतीत त्यांनी आघाडी घेतल्याचे मानले जात आहे.

Mira-Bhayander Vidhansabha:  मिरा-भाईंदरमध्ये उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच
Mira Bhayandar: जामीन मिळवून देण्यासाठी १० लाखांची मागणी; सहायक पोलिस निरीक्षकावर गुन्हा


भाजपकडून रविवारी भाईंदर पश्चिम येथील लोटस मैदानावर संकल्प मेळावा घेण्यात आला होता. मेळाव्याला पक्षाचे जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांच्यासह माजी नगरसेवक, पदाधिकारी व पक्षाचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे काही वर्षे सक्रिय राजकारणापासून दूर गेलेले काही वरिष्ठ कार्यकर्तेही या मेळाव्यात सहभागी झाल्याचे दिसले. जिल्हाध्यक्षांसह सर्वच पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणात उमेदवारीसाठी मेहता यांच्याच नावाला पसंती दिली.

गेल्या निवडणुकीत झालेली चूक सुधारून या वेळी मेहता यांच्यासाठीच काम करण्याचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संकल्पही सोडला. मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघासाठी माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यासह विद्यमान आमदार गीता जैन, ॲड. रवी व्यास यांच्यात उमेदवारीसाठी जबरदस्त चुरस सुरू आहे.


कार्यकर्त्यांनी व मतदारांनी आपल्यासोबत राहायचा संकल्प केला आहे. शहरातील विविध समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असा संकल्प करत असल्याचे मेहता यांनी सांगितले. मेळाव्यानिमिताने मेहता यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याचे मानले जात आहे.

Mira-Bhayander Vidhansabha:  मिरा-भाईंदरमध्ये उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच
Mira Road Murder : लिव्ह-इन पार्टनरच्या मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये का शिजवले? आरोपी मनोज सानेचा मोठा दावा!

पाच वर्षांत विकासाची गंगा दुरापास्त


मेळाव्यात नरेंद्र मेहता यांनी गीता जैन यांच्या नावाचा उल्लेख टाळत त्यांच्यावर जोरदार टीका केली. गेल्या पाच वर्षांत शहरात कोणतेही काम झाले नसल्याने शहराचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारकडून राज्यात विकासाची गंगा वाहत असताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी ती शहरात आणली नाही.

त्यामुळे मुख्यमंत्र्यांना विकासकामांच्या उद्‍घाटनांसाठी न बोलावता केवळ दहीहंडीसारख्या कार्यक्रमांनाच निमंत्रित करण्यात आले. आपल्या आमदारकीच्या काळात सुरू झालेली सूर्या पाणी योजना, मेट्रो, काँक्रीट रस्ते अशी विविध विकासकामे पाच वर्षांत पूर्ण होऊ शकली नाहीत. त्यामुळे शहर ठप्प झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे, असा टोला मेहता यांना लगावला.

Mira-Bhayander Vidhansabha:  मिरा-भाईंदरमध्ये उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच
Mira Road Murder Case : इतका संताप आला की प्रेयसीला करवतीने कापले, मिक्सरमध्ये वाटले आणि कुकरमध्ये शिजवलं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.