एका क्लिकवर १०८ रुग्णवाहिका मदतीला दाखल

एका क्लिकवर १०८ रुग्णवाहिका मदतीला दाखल

Published on

एका क्लिकवर १०८ रुग्णवाहिका मदतीला दाखल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ ः आरोग्याशी संबंधित आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वैद्यकीय मदत मिळण्यासाठी, रुग्णालयात दाखल करण्यासाठी १०८ क्रमांकावर कॉल करून रुग्णवाहिका सेवेची मदत घेतली जाते. या सेवेतील सर्वात मोठी समस्या म्हणजे कॉलरचा पत्ता शोधणे. त्यामुळे अनेक वेळा रुग्णवाहिका येण्यास उशीर होतो. ही समस्या सोडवण्यासाठी आता ॲपवर १०८ रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या ॲपवर क्लिक करताच रुग्णवाहिका घटनास्थळी किंवा रुग्णाच्या घरी पोहोचणार आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून यासाठीचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. रुग्णवाहिकेची माहिती मार्च २०२५पासून मोबाईल ॲपवर उपलब्ध करून दिली जाईल. मोबाईलधारकाने ॲपवर क्लिक करताच रुग्णवाहिकाचालक किंवा डॉक्टरचा मोबाईल क्रमांक त्याच्या ॲपवर पाहता येईल. तसेच, रुग्णवाहिका पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल याची अचूक माहितीही या ॲपवर पाहता येईल. या ॲपच्या मदतीने कंट्रोल रूममधील ऑपरेटर ॲपधारकाच्या लोकेशन ट्रॅक करत पीडित व्यक्तीला वेळेत मदत करण्यासाठी रुग्णवाहिका चालकाला मार्गदर्शन करले. जेणेकरून तो त्या ठिकाणी वेळेत पोहोचेल आणि रुग्णांना उपचार मिळू शकेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.