Indian Railway: भारतीय रेल्वेचं दिवाळी, छटपूजेचं नियोजन असं होते, जाणून घ्या माहिती
Indian Railways Festival Special Train Diwali Chhath Puja Express
मुंबई : दिवाळी आणि छट पूजेच्या काळात प्रवाशांच्या गैरसोय टाळण्यासाठी कंबर कसली होती. मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी एकूण ७४० विशेष रेल्वे सेवांची घोषणा केली असून यातील २३३ सेवा आत्तापर्यंत पूर्ण केल्या गेल्या आहेत.
दिवाळी/छट पूजेसाठी मुंबई, पुणे, नागपूर येथून विशेषत: उत्तर भारतात विशेश रेल्वेगाड्या सोडल्या जातात. यंदा मुंबईतून एकूण ३६३ सेवांची घोषणा करण्यात आली असून त्यापैकी २५२ सेवा पूर्ण झाल्या असून आणखी १११ सेवा चालवण्यात येणार आहेत
पुण्यातून ३२७ सेवांपैकी २२१ सेवा पूर्ण झाल्यात तर आणखी १०६ सेवा चालवल्या जातील. नागपूर, लातूर, दौंड इत्यादी ठिकाणांहून ५० सेवा जाहीर केल्या आहेत त्यापैकी ३४ पूर्ण झाल्यात आणि आणखी १६ सेवा चालवणार आहेत.
महाराष्ट्रातील लातूर, सावंतवाडी रोड, नागपूर, पुणे, कोल्हापूर, नांदेड आणि इतर ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने १२५ सेवा जाहीर केल्या. त्यापैकी १०७ सेवा पूर्ण झाल्या आहेत आणि आणखी १८ सेवा चालवल्या जाणार आहेत.
उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने दानापूर, गोरखपूर, छपरा, बनारस, समस्तीपूर, आसनसोल, आगरतळा, संत्रागाछी अशा विविध स्थानकांसाठी जाहीर केलेल्या ५५१ सेवांपैकी ३५६ सेवा पूर्ण झाल्या आहेत आणि आणखी १९५ सेवा चालवल्या जातील.
दक्षिणेकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने करीमनगर, कोचुवेली, काझीपेट, बेंगळुरूसारख्या स्थानकांपर्यंत ६४ सेवा जाहीर केल्या होत्या. त्यापैकी ४४ सेवा पूर्ण झाल्या आहेत आणि आणखी २० सेवा चालवल्या जातील.
रेल्वेनं असं केलं होतं नियोजन
प्रवाशांना मार्गदर्शन आणि मदत करण्यासाठी ‘मे आय हेल्प यू’ बूथ प्रदान केले होते. प्रवाशांच्या सोयीसाठी विविध स्थानकांवर तिकीट काऊंटरची संख्या वाढवली.
प्रमुख स्थानकांवर प्रवाशांना थांबवण्यासाठी होल्डिंग क्षेत्रे तयार केली आहेत. विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने सर्व प्रवाशांना स्थानक परिसरात नियोजित होल्डिंग एरियामध्ये मोफत पिण्याचे पाणी, भोजन आणि शौचालयाची सुविधा पुरवली जात असल्याचे मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.
याशिवाय रांग व्यवस्थापन, रेल्वे स्थानकांवर रेल्वे संरक्षण दलाची कर्मचारी, फुकट्या प्रवाशांवर आळा घालण्यासाठी तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांकडून कसून तपासणी करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.