निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सावध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ ः लोकसभा निवडणुकांमध्ये अनेक मतमोजणी केंद्रावर अंतिम निकालावरून गोंधळ झाला होता. त्यावेळीचा अनुभव लक्षात घेता फेरमतदानाची मागणी झाली तर फॉर्म १७ सी भाग दोन, फेरीनिहाय तक्ता, अंतिम निकाल पडताळणीची प्रत उमेदवार प्रतिनिधीला त्वरित देण्याची मागणी नाना पटोले यांनी केली आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे याबाबतचे पत्रही पाठवण्यात आले आहे.
नाना पटोले यांनी निष्पक्ष व पारदर्शक निवडणुकीसाठी लोकप्रतिनिधी कायद्याच्या तरतुदीअन्वये मतमोजणी टेबलवर फेरीनिहाय मतमोजणी झाल्यावर फॉर्म १७ सी मोजणी प्रतिनिधीची सही घेऊन मोजणी पर्यवेक्षक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देतो. त्याची दुय्यम प्रत मोजणी प्रतिनिधी किंवा उमेदवार प्रतिनिधीला त्वरित देण्यात यावी. तसेच, फेरीनिहाय तक्ता हा फॉर्म १७ सी भाग दोनवरून सहाय्यक निवडणूक अधिकारी तयार करतो. तो परिशिष्ट ५७च्या तक्त्याची दुय्यम प्रत उमेदवार प्रतिनिधीला देण्यात यावी, अशी मागणी पत्रातून केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.