मिरच्या महागल्‍याने मसाला झाला तिखट

मिरच्या महागल्‍याने मसाला झाला तिखट

Published on

वडखळ ता. ११ (बातमीदार) ः पेण, वडखळ बाजारपेठेत मसाल्यासाठी लाल मिरची तसेच गरम मसाल्‍याचे पदार्थ घेण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे.
मसाल्यासाठी कर्नाटकहून येणारी बेडगी, काश्मिरी, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेशातून येणारी गुंटूर आणि महाराष्ट्रातील तेजा, लवंगी मिरचीबरोबर रेशमपट्टी मिरचीलाही मोठी मागणी आहे. महाराष्ट्रातील लोक जास्त प्रमाणात बेगडी, काश्मिरी आणि तेजा मिरचीचा वापर करतात. रायगड जिल्ह्यात आगरी, कोळी समाज अधिक असल्‍याने तिखट, झणझणीत मसाल्यांना पसंती दिली जाते.
मिरचीबरोबर गरम मसाल्याचीही मोठी मागणी आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत १५ ते २० टक्‍के भाव वाढले आहेत. त्‍यामुळे झणझणीत खाण्यासाठी खिसा रिकामा करावा लागणार आहे.

मिरचीचे प्रकार
बेडगी-७०० रुपये
गंटूर-३००
लवंगी ३००
काश्मिरी ८००
संकेश्‍वरी ४४०
हळद १८०

मसाल्‍याचे पदार्थ
धने २००
दालचिनी २१०
चक्रीफुल २००
लवंग ६९०
काळीमिरी ५७०
जवादी १३५०
रामपत्री ६४०
वेलची १८००
त्रिफळा १९०
जिरे १७०

घाऊक बाजारातच मिरच्याचे व मसाल्याचे पदार्थाचे भाव वाढल्याने व वाहतुकीचा खर्च वाढल्याने किरकोळ बाजारातही गतवर्षीच्या तुलनेत दर १० ते २० टक्‍क्‍यांनी वाढले आहे. आता हे भाव स्‍थिर राहतील.
- नरदास पाटील, व्यापारी

मसाला रोजच्या आहारातील अविभाज्य घटक आहे. त्‍यामुळे तो दरवर्षी करावाच लागतो. भाव वाढले म्‍हणून ते कमी वापरता येत नाही. कारण त्‍याशिवाय जेवणात लज्‍जत येणार नाही.
- सविता पाटील, गृहिणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com