उष्म्यामुळे काकडी, ऊस, कोकम, लिंबू दरात वाढ
वडखळ, ता. १९ (बातमीदार) ः उन्हाची काहिली वाढत असल्याने शरीराला थंडावा देणाऱ्या कलिंगड, लिंबू, कोकम आणि काकडीची मागणी वाढली आहे, परंतु अवकाळी पावसाने उत्पादन कमी झाले असून दर्जाही खालावला आहे. शिवाय जी फळे बाजारात आहेत, त्यांचे दरही वाढले आहेत.
स्थानिक कलिंगडाचा गोडवाही सुद्धा कमी झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत सर्वच फळांच्या किमती २० ते २५ टक्क्यांनी वधारल्या आहेत. नाशिक व इतर ठिकाणावरील कलिंगड जिल्ह्यात विक्रीसाठी येत आहेत. लिंबाची आवक घटल्याने दर वाढल आहेत. दहा रुपयाला एक लिंबू विकला जात आहे. परिणामी लिंबू सरबतही महागले आहे.
कोकम, काकडीची आवकही सध्या कमी आहे. उसाचे दरही शेकड्यामागे १०० रुपयांनी वाढले आहेत.
उष्माघातावर उपाययोजना
- शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावे याशिवाय नारळपाणी, लिंबू, कोकम, आवळा, खस सरबत पिण्याला प्राधान्य द्यावे
- कामानिमित्त उन्हात जावे लागल्यास शक्यतो सुती (कॉटन) व पांढऱ्या रंगाचे कपडे वापर करावा. डोक्यावर रुमाल, टोपी, स्टोल गुंडाळावा.
- शेतातील कामे सकाळी ६ ते ११ व सायंकाळी ४ ते ६.३० या कालावधीत करावीत.
- आहारात ताक, दही इत्यादीचा वापर करा. तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ, मद्यपान व मांसाहार टाळावा.
- दुपारच्या वेळात घराबाहेर पडणे टाळावे. लहान मुलांना, गरोदर मातांना, आजारी व्यक्तींना विशेष काळजी घ्यावी.
- अशक्तपणा,थकवा, ताप-उलट्या इ. लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.