C Link: वरळी-वांद्रे सी लिंकवरील टोल सोमवारपासून वाढणार; जाणून घ्या दरवाढ किती असेल?
मुंबई : मुंबई उपनगरातून दक्षिण मुंबईत जाण्यासाठी वांद्रे-वरळी सी लिंकचा वापर करणाऱ्या वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. सोमवार १ एप्रिलसून टोलच्या रकमेत सुमारे १८ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे. हे दर पुढील तीन वर्षांसाठी असणार आहेत. (toll on worli bandra c link to increase from monday know how much price will be increased)
वांद्रे-वरळी सी लिंकवरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. त्यांना टोल आकारणी केली जाते. सध्या कार, जीप, टॅक्सीला एकल प्रवासासाठी ८५ रुपये टोल भरावा लागतो. तो आता १०० रुपये होणार आहे. मिनी बस आणि त्या प्रकारातील वाहनांना १३० रुपये टोल आकारला जात असून तो आता १६० रुपये होणार आहे. (Latest Marathi News)
ट्रक, बस अशा मोठ्या वाहनांना १७० रुपये एवढा टोल भरावा लागतो. त्यामध्ये ४० रुपयांची वाढ केली जाणार असून तो २१० रुपये होणार आहे. ही वाढ ३१ मार्च २०२७ पर्यंत लागू असणार आहे.
...तर सवलत मिळणार
वांद्रे-वरळी सी लिंकच्या टोलची आगाऊ ५० कूपन घेणाऱ्या वाहनधारकांना १० टक्के एवढी सूट, तर १०० कूपन खरेदी केल्यास टोलच्या एकूण रकमेवर २० टक्क्यांची सवलत मिळणार असल्याचे एमएसआरडीसीने स्पष्ट केले आहे. तसेच मासिक पासही सवलतीत उपलब्ध असणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.