Mumbai News : प्रशिक्षकाने अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगास हात लावल्याचे प्रकरण; विशेष न्यायालयाचा मोठा निर्णय

Touching private parts of minors not coaching, but sexual assault says special court
Touching private parts of minors not coaching, but sexual assault says special court esakal
Updated on

देशात सध्या खेळाडूंवरील लैंगिक आत्याचाराविरोधात महिला कुस्तीपटूंचे आंदोलन पेटले असताना मुंबईतील विशेष न्यायालयाने अशाच एका प्रकरणात महत्वाचा निर्णय दिला आहे.

या प्रकरणात, अल्पवयीन मुलींच्या गुप्तांगांना स्पर्श करणे याला कोचिंग म्हणता येणार नाही, तर तो लैंगिक अत्याचार आहे, असे विशेष न्यायालयाने मुंबईतील एका सार्वजनिक शाळेतील कुस्ती प्रशिक्षकाला दोषी ठरवताना म्हटले आहे.

शाळेत मुलींना कुस्ती, लगोरी, कबड्डी आणि यासारखे इतर खेळ शिकवणाऱ्या एका 42 वर्षीय प्रशिक्षकाला 29 मे रोजी पोक्सो (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्स्युअल ऑफेन्स ) कायद्याअंतर्गत दोषी ठरवून पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.

दरम्यान शुक्रवारी उपलब्ध झालेल्या आदेशात या निकालाबद्दल माहिती देण्यात आली आहे. ज्यामध्ये विशेष न्यायाधीश एससी जाधव म्हणाले की, आरोपींनी वेळोवेळी त्यांना अयोग्यरित्या स्पर्श केल्याचेही पीडितांनी सांगितले आहे. या मुद्द्यावर सर्व पीडितांनी दिलेल्या साक्षीदरम्यान ही बाब निश्चित झाली. तसेच कबड्डी किंवा लगोरी खेळताना एखाद्याने दुसऱ्या व्यक्तीच्या शरीराला स्पर्श केला हा आरोपीचा बचाव पटण्याजोगा नाही.

कारण मुलींना गुड टच आणि बॅड टच यात फरक करण्याची समज होती. एखाद्या व्यक्तीने त्यांच्या चेहऱ्याला किंवा कंबरेला किंवा खांद्याला केलेला स्पर्श, त्यांचे स्तन दाबणे, किंवा पीडितांचा अस्वस्थ वाटेल अशा प्रकारे त्यांचे पाय खेचणे, हे आरोपीकडून नॉन पेनिट्रेटीव्ह लैंगिक अत्याचार (non- penetrative sexual assault) असल्याचा निष्कर्ष काढला जाईल, असेही म्हटले आहेत.

Touching private parts of minors not coaching, but sexual assault says special court
मी सावरकरांचा भक्त आहे म्हणून… थुंकण्याला राऊतांनी जोडलं हिंदू संस्कृतीशी; अजित पवारांना देखील टोमणा!

विशेष सरकारी वकील वीणा शेलार यांच्या नेतृत्वाखालील फिर्यादीने न्यायालयात सांगितलं की, एका सार्वजनिक शाळेच्या प्रशिक्षकाने 30 जुलै 2016 रोजी अलिबाग येथे होणाऱ्या लगोरी स्पर्धेसाठी प्रशिक्षण घेत असलेल्या 15 विद्यार्थ्यांकडून पैसे गोळा केले होते. स्पर्धेसाठी 14 मुली आल्या देखील, पण आरोपी प्रशिक्षक काही कारणास्तव स्पर्धा रद्द करण्यात आल्याचे सांगून त्यांना एका रिसॉर्टमध्ये घेऊन गेला.

या रिसॉर्टमध्ये आरोपीने वॉटर स्पोर्ट्समध्ये भाग घेतल्यानंतर मुलींना रांगेत उभे केले आणि त्यांच्या छातीकडे टक लावून पाहात त्यांना अस्वस्थ वाटेल असे वर्तन केले. नंतर बसमधून घरी जाताना एका मुलीचा विनयभंगही झाला. पीडितांपैकी एकाने पालकांना याबद्दल माहिती दिली, त्यानंतर त्यांनी शाळेशी संपर्क साधला होता, परंतु कोणतीही कारवाई न झाल्याने, पोलिसांना एक निनावी पत्र लिहिले गेले आणि त्यानंतर एक महिन्यानंतर 30 ऑगस्ट 2016 रोजी एफआयआर नोंदवण्यात आला.

Touching private parts of minors not coaching, but sexual assault says special court
Love Jihad : इकडं 'लव्ह जिहाद'च्या नावे राडा; पण मुलगी निघाली लेस्बियन, आता म्हणते…

या प्रकरणी लैंगिक छळाचा सामना करणार्‍या पाच मुलींसह नऊ साक्षीदारांनी साक्षी दिली. त्यातील एकाने सांगितले की, आरोपी मुलीस कुस्तीचे डावपेच शिकवतो असे सांगून तिला स्पोर्ट्स रूममध्ये घेऊन जायचा आणि नंतर तिला अयोग्यरित्या स्पर्श करायचा. 2016 मध्ये एका कुस्ती स्पर्धेदरम्यान आरोपीने पीडितेपैकी एकाचा हात पकडत तिच्या स्तनाला स्पर्श केला होता.

पीडितांची उलटतपासणी करताना आरोपीने आपल्या वकिलामार्फत असा दावा केला होता की, कुस्तीच्या खेळात एखाद्या व्यक्तीला धक्का लागणे किंवा दुसऱ्या व्यक्तीने ढकलणे स्वाभाविक आहे. एका मुलीला राज्यस्तरीय स्पर्धेत खेळू न दिल्याने तिने खोटी तक्रार दाखल केल्याचा दावाही त्याने केला होता.

Touching private parts of minors not coaching, but sexual assault says special court
Odisha Train Accident : २३३ जणांचा जीव घेणारा तीन रेल्वेंचा अपघात नेमका झाला कसा? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

दरम्यान न्यायालयाने म्हटले की, लैंगिक अत्याचार आणि लैंगिक छळाच्या प्रकरणांमध्ये पीडितांचे पुरावे महत्त्वाचे असतात आणि आरोपींना या खटल्यात अडकवण्यासाठी ते खोटे साक्ष देत आहेत असे वाटण्यासारखे काही आढळले नाही. तसेच आरोपीने पीडितांना रिसॉर्टमध्ये घेऊन जाणे नाकारले नाही आणि जरी स्पर्धा रद्द झाली असेल, तर त्यांचा सुरक्षेची जबाबदारी म्हणून त्यांना घरी परत नेणे हे त्याचे कर्तव्य होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()