महाड : लॉकडाऊनमुळे रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद होता. आता तो खुला झाला आहे. त्यामुळे पुन्हा मोठ्या संख्येने पर्यटक किल्ला पाहण्यासाठी येत आहेत, परंतु किल्ल्यावरील पाणीटंचाईमुळे ते तहानेने व्याकुळ होतात. गडावर सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने अनेक जण पाण्यासाठी जीव धोक्यात घालून गंगासागर तलावात उतरतात.
रायगडावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यानंतरही या ऐतिहासिक ठेवा असलेल्या ठिकाणी पर्यटकांना अनेक गैरसोयींचा सामाना करावा लागतो. यामध्ये पाण्याची गैरसोय प्रमुख आहे. रायगड किल्ल्यावर गंगासागर तलाव आहे. यामध्ये एप्रिलपर्यंत पाणी असते. याच तलावावर जिल्हा परिषदेने नळ पाणी योजना विश्रामगृहासाठी केली होती. या ठिकाणी पर्यटकांना हमखास पाणी मिळत असे. सामाजिक संस्थेनेही शुद्ध पाणी देण्याची व्यवस्था केली होती, परंतु आता या दोन्ही ठिकाणी पाणी मिळत नाही. जगदीश्वर मंदिराजवळ पिण्याच्या पाण्यासाठी कूलरची व्यवस्था करण्यात आली होती, परंतु त्याचीही मोडतोड झाली आहे. त्यामुळे किल्ल्याच्या पायथ्यापासून बाजारपेठेपर्यंत पर्यटकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे पर्यटक तहानने व्याकुळ होतात.
रायगड किल्ला प्रवेशासाठी पुरातत्त्व विभाग पर्यटकांकडून 25 रुपये शुल्क घेतो, परंतु पर्यटकांच्या सोयीसाठी साधे पाणीही विभाग देत नाही. यामुळे येथे येणारे पर्यटक गंगासागर तलावामध्ये जीव धोक्यात घालून उतरतात आणि पिण्यासाठी पाण्याची बाटली भरून घेऊन जातात. असे करत असताना तलावात पडण्याचा धोका आहे. त्यामुळे रायगडावर नवीन योजना मंजूर होईपर्यंत पर्यटकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळावी, अशी मागणी आहे.
......
...म्हणून घोडे अडले
रायगड किल्ल्यावर 6500 कोटी रुपये खर्चून रायगड संवर्धनाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यासाठी खास रायगड प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. रायगड जिल्हा परिषदेने रायगड प्राधिकरणाकडे सुमारे 20 कोटी रुपयांची पाणीयोजना असणारे अंदाजपत्रक सादर केलेले आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी आणि पुढे निविदांची प्रक्रिया रायगड प्राधिकरणाकडून करायची आहे, परंतु गेल्या अनेक वर्षांपासून ही निविदा प्रक्रिया रखडल्याने रायगडावर सार्वजनिक पाणीपुरवठा व्यवस्था होऊ शकली नाही.
रायगड किल्ल्यासाठी सुमारे 20 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून प्राधिकरणाकडे सादर करण्यात आले आहे. पुढील निविदा प्रक्रिया रायगड प्राधिकरण यांच्यामार्फत केली जाणार आहे.
- जगदीश फुलपगारे,
शाखा अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग
रायगडावर अनेक कामे सुरू असली तरी या ठिकाणी प्राथमिक गरजांना प्राधान्य देण्यात आले नाही. गडाच्या पायऱ्यांच्या मार्गावर पिण्याच्या पाण्याची सुविधा आवश्यक आहे, परंतु याकडे दुर्लक्ष केले आहे.
- महेश मोरे,
शिवप्रेमी
Tourists thirsty at Raigad people need to wents Gangasagar for drinking water
-------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.