Mumbai Metro : मुंबईतील मेट्रो ३ च्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी फुटणार...

लवकर वाहतूक प्रभावित ४ रस्ते खुले होणार
Mumbai Metro
Mumbai Metro sakal
Updated on

मुंबई : मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी करून मुंबईकरांचा प्रवासाचा वेग वाढावा यासाठी मुंबई अनेक मेट्रो मार्गाचे काम सुरु आहे. मुंबईकरांसाठी राज्य सरकारचा मेट्रो ३ या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम सुरु आहे.

या कामामुळे मुंबईतील अनेक रस्ते कमी जागेत वाहतुकीसाठी खुले असल्याने वाहनचालकांना अडथळ्यांचा सामना करावा लागतो आहे. मात्र लवकरच या वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. भूमिगत मेट्रो ३चे ८४.३% काम पूर्ण झाले आहे.

कुलाबा- सिप्झ या भूमिगत मेट्रो मार्ग ३च्या कामामुळे वाहनचालक, बसचालक आणि स्थानिक लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेट्रो ३च्या कामासाठी बीकेसी आणि सिप्झ दरम्यानचे सर्व रस्ते जानेवारी २०२४पर्यंत पूर्ववत केले जाणार आहेत.

मात्र, ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान चार सर्वाधिक वाहतूक प्रभावित रस्ते वाहतुकीसाठी पूर्ववत केले जातील. मेट्रो ३च्या पहिल्या टप्प्यात समाविष्ट असलेल्या आरे ते बीकेसी मार्गामध्ये १० स्थानके आहेत, त्यापैकी ९ भूमिगत स्थानके आहेत. हा प्रकल्प मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल)द्वारे राबविण्यात येत आहे.

२०१६मध्ये काम सुरू झाले

सप्टेंबर २०१६ मध्ये स्थानक आणि भुयारीकरच्या कामासाठी रस्त्यावर बॅरिकेटिंग करण्यात आले होते. परंतु यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागला. परंतु ३० ऑगस्ट रोजी, एमएमआरसीएलने बीकेसी आणि सिप्झ मधील दहा ठिकाणी ३०,२४४ चौरस मीटर रस्ते पूर्ववत केले आहेत.

सद्यस्थितीत, मेट्रो ३चे एकूण ८४.३ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यापैकी एकूण नागरी काम ९४.९टक्के, एकूण कार्यप्रणाली ५७.९ टक्के, एकूण स्थानक बांधकाम ९२ टक्के, भुयारीकरण १०० टक्के, डेपो ७४.४ टक्के आणि मेन लाइन ट्रॅक ६८.४ टक्के इतकी कामे पूर्ण झाली आहेत.

टप्पा १ - ९१%

स्थानक आणि भुयारीकरण - ९८.३%

प्रणाली कार्य - ७२.५%

स्थानक बांधकाम - ९५%

मेन लाइन ट्रॅक - ९९%

OCS काम - ६४.२ %

टप्पा २ - ७९%

स्थानक आणि भुयारीकरण - ९६.२%

प्रणाली कार्य - ४७.१%

स्थानक बांधकाम. - ९०.५%

मेन लाइन ट्रॅक - ५०.९%

OCS काम - ४७.६%

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()