Local Service : तीन तास ट्रान्स हार्बर लोकल सेवा बंद; तब्बल ५२ लोकल फेऱ्या रद्द, हार्बरवासीयांचे अतोनात हाल!

हार्बर मार्गावरील पनवेल ते बेलापूर स्थानकात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या रेल्वे मार्गिकेचे काम सुरु असल्याने खबरदारी म्हणून मध्य रेल्वेने पनवेल ते खादेश्वर दरम्यान लोकलच्या वेगावर मर्यादा घातली.
Harbour Local
Harbour Localsakal
Updated on

मुंबई - हार्बर मार्गावरील पनवेल ते बेलापूर स्थानकात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या रेल्वे मार्गिकेचे काम सुरु असल्याने खबरदारी म्हणून मध्य रेल्वेने पनवेल ते खादेश्वर दरम्यान लोकलच्या वेगावर मर्यादा घातली आहे.

त्यामुळे लोकल सेवा एकामागे एक खोळंबत असल्याने गुरुवारी (ता.०५) सकाळी ८ ते ११ या वेळेत अचानक मध्य रेल्वेने बेलापूर ते पनवेलदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. अवघ्या तीन तासात ट्रान्सहार्बर मार्गावरील एकूण ५२ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे.

सततच्या मेगाब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांना गेल्या आठवड्याभरापासून नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अशातच गुरुवार मध्य रेल्वे प्रशासनाकडून सकाळी ८ ते ११ या वेळेत बेलापूर ते पनवेल ट्रान्स हार्बर लोकल रद्द करण्यात आली.

अचानक झालेल्या उद्घोषणामुळे बेलापूर, पनवेल, नेरूळ, वाशी स्थानकात प्रवाशांचा गोंधळ उडाला. मात्र, पनवेल स्थानकात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचे काम सुरू आहे. या कामामुळे पनवेल ते खांदेश्वर स्थानकात ३० किमी वेगमर्यादा प्रशासनाकडून ठरवण्यात आली आहे. यामुळे पनवेलहून सीएसएमटीकडे आणि सीएसएमटीहून पनवेलकडे जाणाऱ्या गाड्यांचा वेग सकाळपासून मंदावला होता.

ट्रान्स हार्बर मार्गावर ही लोकल उशिराने धावत होत्या. या गाड्यांचा वेग मंदावल्याने पनवेल ते खांदेश्वर स्थानकात या गाड्या एका मागोमाग एक येऊ लागल्याने दुर्घटना होण्याची शक्यता होती. तसेच ह्यामुळे हार्बर मार्गावरील लोकल सेवनावर मोठा परिणाम दिसून येत होता.

त्यामुळे मध्य रेल्वेने सकाळी ८ ते ११ या कालावधीत अचानक बेलापूर ते पनवेल ट्रान्स हार्बर लोकल रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांना मोठा गोंधळ उडाला होता. अवघ्या तीन तासात ट्रान्सहार्बर मार्गावरील अप आणि डाऊन दिशेच्या एकूण ५२ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहे.

या कारणामुळे लोकल वाहतूक बंद?

हार्बर मार्गावर दररोज ६१४ आणि ट्रान्सहार्बर २६३ लोकल फेऱ्या होतात. साधारणतः हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल ताशी वेग ८० किलो मीटर इतकी आहे. मात्र, गेला काही दिवसापासून पनवेल ते बेलापूर स्थानकादरम्यान डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या रेल्वे मार्गिकेसाठी मेगाब्लॉक घेऊन काम सुरु आहे.

त्यामुळे खबरदारी म्हणून पनवेल ते खांदेश्वर स्थानकात लोकलची वेगमर्यादा ताशी ८० वरून ३० किलोमीटर आणली. त्यामुळे लोकल सेवा कासव गतीने धावत असल्याने पनवेल ते बेलापूर दरम्यान लोकल सेवा एकामागेएक खोळंबल्या होत्या. परिणामी त्याच्या फटका हार्बर आणि ट्रान्सहार्बरला बसला होता.

त्यामुळे हार्बर मार्गावरील लोकल सेवांचे वेळापत्रकावर परिणाम पडू नयेत म्हणून आणि मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत राहण्यासाठी बेलापूर ते पनवेल ट्रान्स हार्बर लोकल सेवा पनवेल ते बेलापूर दरम्यान सकाळी ८ वाजतापासून ते ११ वाजेपर्यत रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी सकाळला दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.