सकाळ IMPACT: आच्छाड तपासणी नाक्यावरील 20 अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली; एक एआरटीओ आणि दोन डेप्युटी आरटीओंना शोका्ॅज

toll plaza
toll plaza
Updated on

मुंबई: गुजरात, राजस्थान राज्यातून महाराष्ट्रात सर्रास खासगी प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे मुंबई बस मालक संघंटनेने उघड केले. या अवैध प्रवासी वाहतूकीचा सकाळ ने भंडाफोड केल्यानंतर ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाचे आरटीओ रवि गायकवाड यांनी तपासणी नाक्यावरील 20 अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली केली आहे. तर एक एआरटीओ आणि दोन डेप्युटी आरटीओंना शोकाॅज देण्यात आली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर देशात लाॅकडाऊन आहे. त्यामूळे सार्वजनिक प्रवासी वाहतूकीवर बंदी आहे. मात्र, गुजरात, राजस्थान राज्यातील कामगारांना अवैध पद्धतीने मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे सोडण्याचे काम सुरू होते. या खासगी वाहनांमध्ये  स्लिपर, सिटर आसणांवर प्रवाशांची गर्दी करून, कोणत्याही प्रकारच्या पासेस न काढताच कोविड-19 चे नियमांचे उल्लघंन करून प्रवास केल्या जात होते. मात्र, मुंबईतील खासगी प्रवासी वाहतूकदारांनी या वाहनांना मुंबईत प्रवास करणाऱ्या टोल नाक्यावर पकडल्याने परिवहन विभागाती तारांबळ उडाली होती. 

त्यानंतर राज्यातील परिवहन विभागाने या वाहनांवर कारवाई केली असून, गुजरात आणि महाराष्ट्राला जोडणाऱ्या आच्छाद या सिमा तपासणी नाक्यावरील मोटार वाहन निरिक्षक पदावरील  20 अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करून त्यांना त्यांच्या मुख्यालयी पाठवण्यात आले आहे. तर नविन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यामध्येच एक सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, दोन उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना शोकाॅज देण्यात आले आहे. या कारवाईनंतर अवैध प्रवासी वाहतूक बंद झाल्याचा दावा ठाणे आरटीओ विभागाने केला आहे. 

अवैध प्रवासी वाहतूक प्रकरणाची चौकशी होणार:

लाॅकडाऊन असतांना, राजस्थान, गुजरात राज्यातून महाराष्ट्रात खासगी प्रवासी वाहतूकीची वाहने तपासणी नाक्यांवर न तपासता कशी सोडण्यात आली, किंवा या वाहनांना तपासण्यातच आले नाही का ? या मार्गांने राज्य परिवहन विभागाने आच्छाद तपासणी नाक्यांवर नियुक्त असलेल्या अधिकाऱ्यांची आणि संबंधीत नियंत्रण अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. 

कर न घेताच अवैध वसूली:

आच्छाड सिमा तपासणी नाक्यावरील कर न घेताच अवैध वसूली करण्याचा प्रकार सर्वक्षृत आहे. वर्ष 2018 पुर्वी आच्छाड सिमा तपासणी नाक्यावरून गुजरात नाक्याच्या तुलनेत कमी महसूल गोळा झाल्याने 2018 मद्ये राज्याच्या अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर आता याच सिमा तपासणी नाक्यांवरील अत्याधुनिक यंत्रणा आणि सीसीटीव्हीचा वापर न करताच, कर न घेता अवैध प्रवासी वाहतूकीकडून सर्रास वसूली सुरू असल्याची ही शंका सुत्रांनी व्य़क्त केली आहे.

"मुंबई बस मालक संघंटनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन शनिवारी रात्री पहाटे 5 वाजेपर्यंत चेकपोस्टवर स्वतहा कार्यरत होतो. मात्र अवैध प्रवासी वाहतूकीची एकही बस आढळून आली नाही. यादरम्यान मुंबई बस मालक संघंटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सुद्दा करण्यात आली आली, त्यासह तपासणी नाक्यावर कडक नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची अदलाबदल करण्यात आली आहे", असे ठाणे विभागाचे आरटीओ रवी गायकवाड यांनी म्हंटले आहे. 

"मुंबई बस मालक संघंटनेने गेले दोन दिवसात 100 ते 125 परप्रांतीय बेकायदेशीर बसेस पकडून आरटीओंचा ताब्यात दिल्या आहे. संघंटनेने रस्त्यांवर उतरून स्वतहा बसेस पकडल्यानंतर आणि ही अवैध प्रवासी वाहतूकीची बाब लक्षात आणून दिल्यानंतर आरटीओ विभागाचे पुर्णपणे सहकार्य मिळाले, त्यानंतर ठाणे आरटीओंनी अच्छाड चेकपोस्टवर येऊन स्वतः तपासणी केली",असे मुंबई बस मालक संघंटनेचे सरचिटणीस हर्ष कोटक यांनी सांगितले आहे. 
transfer of 20 officers on achhad toll plaza after Sakal news 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.