मोखाडा : आदिवासी तालुक्यांमध्ये दिवाळी सणं आणि शेतीची कामे अंतिम टप्प्यात आल्यानंतर, आदिवासी शेतमजुर, भूमीहीन रोजगारासाठी शहराची वाट धरतात. बहुतांश गाव, पाडे, वाडी वस्तीतील मजुर रोजगारासाठी स्थलांतरीत झाला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर त्याचा मोठा परिणाम होऊन, मतदान घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थलांतरीत मजुरांना मतदानासाठी आणण्याचे मोठे आव्हान उमेदवार आणि कार्यकर्त्यांपुढे ठाकले आहे.