Dombivali News : फुलनदेवी सारखे शस्त्र उचलण्याची वेळ येण्याआधी जागे व्हा; माजी नगरसेविका शीतल मंढारी

आदिवासी दिनानिमित्त कल्याणमध्ये आयोजित रॅलीत केडीएमसीच्या माजी नगरसेविका शीतल मंढारी यांनी फूलनदेवीचा वेश परिधान केला होता.
former corporator shital mandhari
former corporator shital mandharisakal
Updated on

डोंबिवली - आदिवासी दिनानिमित्त कल्याणमध्ये आयोजित रॅलीत केडीएमसीच्या माजी नगरसेविका शीतल मंढारी यांनी फूलनदेवीचा वेश परिधान केला होता. त्यांची ही भूमिका साऱ्यांचेच लक्ष वेधत होती. मणिपूर घटनेचा निषेध यावेळी त्यांनी नोंदवत कोवळ्या कळ्यांवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत.

फूलनदेवी यांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शस्त्र उचलले. आत्ताच्या महिलांना हातात शस्त्र उचलण्याची वेळ येऊ देऊ नका असा संदेश देत वेळीच जागे होण्याचा सल्ला त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

आदिवासी दिन सर्वत्र उत्सवात साजरा केला जात आहे. कल्याणामध्ये आदिवासी दिनानिमित्त आदिवासी उत्सव समितीच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सुभाष मैदान येथून रॅलीची सुरुवात झाली. शिवाजी महाराज चौक, पत्रीपूल, चक्की नाका, विजयनगर येथे रॅलीचा समारोप झाला.

या रॅलीत आदिवासी बंधू भगिनी विविध वेशभूषेत सहभागी झाले होते. आदिवासींची संस्कृती, आदिवासी नृत्य, आदिवासी गीते, पोवाडे, विविध वाद्य, वेशभूषा, पारंपारिक लोकनृत्याच्या माध्यमातून आदिवासी कलागुण पाहायला मिळाले. तसेच आदिवासी क्रांतिकारकांचे देखावे सादर करण्यात आले.

या रॅलीत संयुक्त आदिवासी उत्सव समिती कल्याणचे अध्यक्ष प्रभुदास पंधरे, सचिव सुरेश पवार, कोशाध्यक्ष यशवंत मलये, माजी नगरसेविका शीतल मंढारी, सहाय्यक आयुक्त सविता हिले, पालिका अधिकारी भागाजी भांगरे यांसह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.

रॅलीत माजी नगरसेविका शीतल मंढारी यांनी केलेला फूलनदेवीची वेशभूषा साऱ्यांचेच लक्ष वेधून गेली. आपल्या वेशभूषेविषयी त्या म्हणाल्या, फुलनदेवीवर झालेल्या अत्याचाराने तिला शस्त्र उचलण्यास भाग पाडले. आज देखील या परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही.

कोवळ्या चिमूरड्या कळ्यांवर बलात्कार होत असून महिला मुलींना स्वसंरक्षणासाठी शस्त्र उचलण्याची वेळ आणू नका. हाच संदेश देण्यासाठी आपण फुलनदेवीचा वेश परिधान केल्याचे सांगितले. तर यावेळी त्यांनी मणिपूर मधील हिंसा थांबवत अत्याचाऱ्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी देखील केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.