सत्याचाच विजय होईल, मराठी माणसांनी सत्याच्या बाजूने उभे रहावे - अक्षता नाईक

सत्याचाच विजय होईल, मराठी माणसांनी सत्याच्या बाजूने उभे रहावे - अक्षता नाईक
Updated on

अलिबाग :  अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्याचा आरोप करत अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली होती. त्यामुळे 'सत्य आपोआप बाहेर पडतं. मराठी माणसांनी सत्याच्या पाठिमागे उभे राहावं, असे भावनिक आवाहन अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक आणि मुलगी आज्ञा नाईक यांनी केले आहे.

मुंबई हायकोर्टाने अर्णब गोस्वामीला अंतरिम जामीन नाकारल्या नंतर अलिबाग सत्र न्यायालयात पुर्ण निरीक्षण  याचिकेवर सुनावणी सोमवारी दुपारी तीन वाजता सुरु झाली. यावेळी अन्वय नाईकची पत्नी आणि मुलगी अलिबाग न्यायालय परिसरात उपस्थित होत्या. यावेळी प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधताना सत्याया विजय होईल असा विश्वास या दोघींनीही त्यक्त केला आहे. न्यायालयच्या निर्णयाचे अक्षता नाईक यांनी समाधान व्यक्त केले आहे. या प्रकरणात राजकारण केले जात असून आमचा याच्याशी काहीही संबंध नाही. मराठी माणसांनी या प्रकरणात सत्याची बाजू घ्यावी असे आवाहन केले.

जेल प्रशासन अर्णब गोस्वामींची पूर्ण काळजी घेत आहे; राज्यपालांच्या फोननंतर अनिल देशमुखांचे स्पष्टीकरण

 रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेबाबत राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून चर्चा केली होती. राज्यपाल य़ांनी गोस्वामींना दिल्या जाणाऱ्या वागणूकीवर गृहमंत्र्यांशी चर्चा केल्याचे समजते. त्यावर गृहमंत्री यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

गृहमंत्री अनिल देशमुख म्हटले की,  अर्णब गोस्वामी यांची योग्य काळजी घेतली जात आहे. ते तुरंग प्रशासनाची परवानगी घेऊन कुटूंबाशी बोलू शकतात. परंतु व्हिडिओ कॉल वेगैरे करणे चूक आहे. राहिला मुद्दा कुटूंबियांना भेटण्याचा तर, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच  तुरुंगामध्ये असलेल्या व्यक्तींना कुटूंबाना भेटने राज्य सरकारने थांबवले आहे. त्यामुळे हे सर्व आपल्याच संरक्षण आणि काळजी पोटी असल्याचे देशमुख यावेळी म्हणाले. पत्रकारांच्या अधिक प्रश्नांवर बोलताना, हे प्रकरण न्यायाधिन असल्यामुळे जास्त बोलता येणार नाही असेही देशमुख यांनी म्हटले.

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.