किशोरवयीन मुलांना टीबीचा संसर्ग; मुलींचे प्रमाण लक्षणीय, पालिकेचा अभ्यास सुरू

Tuberculosis
Tuberculosissakal media
Updated on

मुंबई : कोविड-19 महामारीमुळे (corona pandemic) 2020 मध्ये क्षयरोग (Tuberculosis) नियंत्रण आणि निर्मूलन मोहिमेवर परिणाम झाला आहे. सन 2021 मध्ये महापालिकेच्या (bmc) क्षयरोग नियंत्रण कक्षाने पुन्हा एकदा मोहिमेवर भर दिला आणि मोठ्या संख्येने मुंबईकरांची तपासणी केली, ज्यातून 15 वर्षांखालील बालकांना टीबीची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. सन 2019 मध्ये 4463 नवीन रुग्ण आढळून आले, तर 2021 मध्ये 5446 नवीन रुग्ण आढळले. वरील आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की बाधितांची संख्या 22 टक्क्यांनी वाढली आहे. गंभीर म्हणजे किशोरवयीन मुलींमध्ये टीबीचा संसर्ग (tuberculosis infection to teenager) असण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

Tuberculosis
BMC: बेस्टचे विलीनीकरण नाहीच; ८०० कोटींची आर्थिक मदत देण्याची घोषणा

पालिकेने दिलेल्या अहवालानुसार, महामारीपूर्वीच्या तुलनेत, सध्या किशोरवयीन मुलांमध्ये टीबी वाढत आहेत. 2017 मध्ये 2,390 नव्या टीबी रुग्णांचे निदान झाले, त्यानंतर 2018 मध्ये ही संख्या 4389, 2019 मध्ये 4463 त्यानंतर, 2020 मध्ये म्हणजेच कोविड काळात 3553 एवढे किशोरवयीन टीबी रुग्ण नोंदले गेले मात्र, हे प्रमाण 2020 ते 2021 दरम्यान वाढून 5470 एवढ्या टीबी रुग्णांची नोंद झाली. दरम्यान 2019 च्या तुलनेत 2021 मध्ये किशोरवयीन मुलांमध्ये टीबीचे प्रमाण 22 टक्क्यांनी वाढले आहे.

मुलींचे प्रमाण अधिक

पालिकेने 15 वर्षांखालील दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच ही वर्षात मुलींमध्ये मुलांच्या तुलनेत टीबीचे प्रमाण जास्त असल्याचे दिसत आहे. 2017 मध्ये एकूण निदान झालेल्या टीबी रुग्णांपैकी 845 मुले आणि 1541 मुली होत्या. त्यानंतर 2018 मध्ये 1578 मुले आणि 2808 मुलींची नोंद झाली आहे. 2019 मध्ये 1576 मुले आणि 2886 मुली होत्या. तर, कोविड महामारीत 2020 मध्ये 1166 मुले आणि 2383 मुलींची नोंद करण्यात आली आहे. मात्र, आता हे प्रमाण वाढले असून 3, 741 किशोरवयीन मुलींना आणि 1728 मुलांना टीबीची लागण झाली आहे.

Tuberculosis
उल्हासनगरातील प्रभाग रचनेवर नाराजी; हरकती नोंदवण्यासाठी शिवसेनेसोबत बैठक

2019 च्या तुलनेत 22 टक्क्यांनी वाढ

15 वर्षांखालील टीबी रुग्णांमध्ये 2019 च्या तुलनेत 2021 मध्ये टीबी रुग्ण 22 टक्के वाढले आहेत. 15 वर्षांखालील मुलामुलींमध्ये टीबीचे प्रमाण वाढल्याचे आमच्या ही निदर्शनास आले आहे त्यातही मुलींमध्ये हे प्रमाण जास्त आहे. यात नेमके काय कारण आहे हे शोधण्याचा पालिका प्रयत्न करत आहे. शिवाय त्या संदर्भातील उपाययोजनाही केल्या जात आहेत, असे टीबी नियंत्रण विभागाच्या प्रमुख आणि पालिकेच्या उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. प्रणिता टिपरे यांनी सांगितले.

डाॅ.  टिपरे यांच्या म्हणण्यानुसार, लहान मुलांमध्ये टीबी वाढतोय यावर संशोधन सुरू आहे. कोविड दरम्यान मुले घरी होती. मुले शाळेत जात होते, चांगली हवा त्यांना मिळत होती. कदाचित त्यांच्या घरी टीबी रुग्ण असू शकतील त्यांच्या संपर्कात ते येत असतील त्यातून त्यांना ही संसर्ग झाला असेल. हे निरीक्षण आधीच पालिकेकडून सुरू झाले आहे. जसे की त्यांच्या घरात टीबी रुग्ण आहे का? त्यांच्याकडून यांना टीबी झाला आहे का? यावर अभ्यास सुरू झाला आहे.

मुलींमध्ये का वाढले टीबीचे प्रमाण ?

मुलींना आता मागे न ठेवता त्यांच्या चाचण्या केल्या जात आहेत, ही एक जमेची बाजू आहे. एरवी, मुलींच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते, पण, आता तसं न होता मुलींना प्राधान्य दिले जात आहे.  सामाजिक दृष्टिकोनातून विचार केल्यास घरातील रुग्णांची काळजीही महिलाच किंवा मुलीच घेतात. त्यातुन त्यांना कोणत्याही संसर्गाचे प्रमाण अधिक असू शकते, असेही डाॅ. टिपरे यांनी सांगितले.

गेल्या 5 वर्षातील टीबीची आकडेवारी

2017       2390 

2018       4389

2019        4463

2020         3553

2021         5470

महामारीच्या काळात तृतीयपंथी समुदायामध्ये टीबी शोधण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. 2017 मध्ये, 15 वर्षांखालील 4 तृतीयपंथी क्षयरोगाच्या संसर्गाने ओळखले गेले, हे प्रमाण 2018 मध्ये 3 पर्यंत होते. 2019 मध्ये फक्त एकाला टीबीची लागण झाली होती. 2020 मध्ये 4 आणि 2021 मध्ये 1 तृतीयपंथीला टीबीची लागण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.