चिमुकल्या तुलसीची शिक्षणासाठी धडपड; फळं विकून पूर्ण केलं स्वप्न

मुंबईकर मराठमोळ्या उद्योजकाचं सहकार्य
online education
online education
Updated on

मुंबई : घरची गरीबी... लॉकडाऊनमुळे वडिलांची नोकरी सुटली... ऑनलाइन शिक्षणासाठी स्मार्टफोन परवडत नाही... तरीही जमशेदपूरच्या तुलसी या बारा वर्षांच्या चिमुकलीनं घरच्यांचा विरोध पत्करून शिक्षणासाठी जिद्दीने आंबे विकण्यास सुरुवात केली. तिच्या या जिद्दीला सलाम करत मुंबईकर उद्योजक अमेय हेटे यांनी तिच्या टोपलीतील डझनभर आंबे विकत घेतले आणि तिचं शिक्षणाचं स्वप्न पूर्ण केलं. (twelve years old Tulsi struggles for education fulfilled dreams by selling fruits)

online education
साजन चला टोकियो! ऐतिहासिक कामगिरीसह मिळवले ऑलिम्पिकचे तिकीट

सुरुवातीला कोरोनाच्या संकटामुळं पाचवीत शिकणाऱ्या तुलसीची शाळा वर्षभर बंद पडली. पण त्यानंतर शाळा बंद असल्यातरी ऑनलाइन वर्ग सुरु झाले. पण या ऑनलाइन वर्गांसाठी स्मार्टफोन नसल्याने तुलसीला शिक्षण घेता आले नाही. त्यातच तिच्या वडिलांची नोकरी गेली. त्यामुळे आता फोन विकत घेणं आणि शिक्षण चालू ठेवणं तिच्यासाठी अशक्य बनलं होतं. पण ती हारली नाही. तीने पाच हजार रुपयांचा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी जिद्दीने आंबे विकण्यास सुरुवात केली. लॉकडाउनमुळे रस्ते ओस पडलेला असतानाही रस्त्यावर आंबे विकणाऱ्या या चिमुकलीची एका स्थानिक पत्रकाराने उत्सुकतेपोटी चौकशी केली. त्यानंतर तिची शिक्षणासाठीच्या जिद्दीची कहाणी त्याने समाजमाध्यमांच्या माध्यमातून कथन केली.

टोपलीतील आंबे विकले गेले १ लाख २० हजारांना

दरम्यान, तुलसीची ही जिद्दीची कहाणी मुंबईच्या व्हॅल्युबल एज्युटेनमेंटचे व्यवस्थापकीय संचालक अमेय हेटे यांनी वाचली. त्यानंतर त्यांनी तात्काळ तिला शिक्षणासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अमेय हेटे यांनी तिच्या टोपलीतील एक आंबा दहा हजार रुपये या दराने डझनभर आंबे एक लाख वीस हजार रुपयांना विकत घेतले. ही रक्कम त्यांनी तिच्या वडिलांच्या बँक खात्यात वर्गही केली. त्यामुळे स्मार्टफोन विकत घेऊन शिक्षण सुरु करणे आता तुलसीला शक्य झाले आहे. तसेच तिच्या कुटुंबियांची कोरोनामुळे कामधंदा नसल्याने तात्पुरती गरजही भागली.

अमेय हेटेंचं तुलसीसाठी कौतुकाचं पत्र

या मदतीनंतर अमेय हेटे यांनी तुलसीला एक कौतुकाचं पत्रही लिहिलं. यात हेटे म्हणतात, "तुझ्यासारखे असंख्य विद्यार्थी फारशा पायाभूत सुविधा नसतानाही ऑनलाइन शिक्षणाच्या नव्या पद्धतीला सामोरे जाण्यासाठी धडपडत आहेत. तू जिद्दीने अडथळ्यांवर मात करण्यासाठी धिराने उभी राहीलीस याचं मला खरोखर कौतुक वाटतं. तुझा शिक्षणाचा हा प्रवास तू पूर्ण करशील आणि तुझ्या या जिद्दीतून अन्य विद्यार्थीही स्फूर्ती घेतील"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()