कल्याण - कल्याण रेल्वे स्थानकात अंमली पदार्थ नियंत्रण पथकाने सापळा रचून एकाला अटक केली असून त्याकडून सुमारे 2 लाखा रुपयांपेक्षा अधिक रकमेचा गांजा जप्त केला.
मंगला एक्सप्रेसने एक प्रवासी गांजा नेणार असल्याची माहिती मिळताच बुधवारी कल्याण रेल्वे स्थानकात एक वाजता अंमली नियंत्रण पथकाचे ए. के. गुप्ता आणि एस. सम्राट यांनी कल्याण रेल्वे महिला पोलीस उपनिरीक्षक कल्पना साहू यांच्यासह कल्याण रेल्वे स्थानक फलाट 4 आणि 5 वर सापळा रचला होता.
मंगला एक्स्प्रेस विशेष मेल येताच पथकाने प्रवासी वर्गाच्या सामानाची तपासणी सुरू केली होती. या तपासणीमध्ये घाटकोपर राहणारा सलीम अयुब शेख ( 38) याची बॅग तपासणी केली असता गांजाची पानेप्रत्येकी 2 किलो वजन असलेली 6 पाकिटे आढळून आली. याची किमत अंदाजे 2 लाख 40 हजार इतकी असून अंमली पदार्थ नियत्रण पथकाने हा गांजा जप्त केला आहे. त्याने दिलेल्या माहिती नुसार त्याला कल्याण स्टेशन जवळ हफीस नावाच्या व्यक्तीने हे अमली पदार्थ त्याला इच्छित स्थळी पोचविण्यासाठी 10 हजार रुपये दिल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने शेख याला ताब्यात घेतले असून त्याने दिलेल्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे .
----------------------------------------------------
Edited by Tushar Sonawane
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.